सामान्य माणसालाही समजते, की ही भाजपची खेळी आहे – बाळासाहेब थोरात

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणासाठी उद्याचा (३० जून) महत्त्वाचा दिवस असेल. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून बहुमत सिद्ध करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रात अल्पमतात आलेल्या उद्धव ठाकरे सरकारची उद्या (३० जून) फ्लोर टेस्ट होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घटनेत दिलेल्या अधिकाराचा वापर करून उद्धव सरकारला उद्या बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. विधानसभेचे अधिवेशन उद्या सकाळी 11 वाजता सुरू होणार असून, सायंकाळी 5 वाजेपर्यंत फ्लोअर टेस्ट पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

या संपूर्ण नाट्यमय घडामोडी मागे भाजपची खेळी (BJP’s game) असल्याचा आरोप काँग्रेस नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Revenue Minister Balasaheb Thorat ) यांनी केला आहे. याबाबत माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, असून काही कायदेशीर बाबी आहेत. त्या तपासल्या जात आहेत. याबाबत योग्य तो निर्णय घेऊ असेही थोरात यांनी यावेळी म्हणाले आहेत.

थोरात म्हणाले की, वास्तविक १६ आमदारांना अपात्र केल्याप्रकरणी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्याचबरोबर उद्या बहुमत सिद्ध करायचं हे मला व्हाट्सअप द्वारे समजलं आहे. त्याबाबत अधिकृत पत्र माझ्याकडे आलेल नाही. परंतु, इतक्या कमी कालावधीमध्ये उद्याच्या उद्या गडचिरोली, भंडारा येथील आमचे काँग्रेसचे आमदार मुंबईत कसे येऊ शकतील हा सुद्धा प्रश्न आहे. इतक्या कमी अवधीत हे आमदार मुंबईत कसे पोहोचणार. याबाबत आम्ही सर्व नेते चर्चा करणार आहोत असे थोरात म्हणाले.