‘ऐट राजाची अन् वागणूक भिकाऱ्याची; सरकारने शेतकऱ्यांच्या शेतात गाढवाचा नांगर फिरविला’

sadabhau khot

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले.

या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मदत केली जाणार असून ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.

या तोकड्या मदतीवरून आता राज्याचे माजी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ऐट राजाची, वागणूक भिकाऱ्याची अशी सरकारची अवस्था आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या शेतात गाढवाचा नांगर फिरविला आहे. लवकरच मी सरकार विरोधात किसान परिषद घेणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही परिषद घेणार आहे, असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=-oKz-KhwmvA&t=4s

Previous Post
anil parab

डिझेलवर धावणाऱ्या १ हजार गाड्यांचे सीएनजीमध्ये करणार रुपांतर – अनिल परब

Next Post
darekar - fadnvis

‘सत्ताधाऱ्यांना फडणवीसांबद्दल किती पोटशूळ आहे हे रोज आपल्याला बघायला मिळते’

Related Posts
'मविआच्या सभांना लोकही येत नाहीत, आता त्यांना मंगल कार्यालयात वज्रमूठ सभा घ्यावी लागेल'

‘मविआच्या सभांना लोकही येत नाहीत, आता त्यांना मंगल कार्यालयात वज्रमूठ सभा घ्यावी लागेल’

मुंबई – उद्धव ठाकरे यांना स्वत:चा पक्ष सांभाळता येत नाही. ४० आमदार त्यांना सोडून गेले आहेत. आताही रोज…
Read More
Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनाची आतुरता संपली! पाहा गणपती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि साहित्य यादी

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनाची आतुरता संपली! पाहा गणपती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि साहित्य यादी

Ganesh Chaturthi 2023 Shubh Muhurat Puja Vidhi Samagri: गणेश चतुर्थीचा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. जो…
Read More
रामदास कदम

‘संपूर्ण मुंबईतील शौचालयातून जेवढी घाण निघते, त्यापेक्षाही जास्त घाण रामदास कदम यांनी काल ओकली’

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर जाहीरपणे पातळी सोडून टीका करत आहेत. आधी…
Read More