ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

मुंबई – ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने काढण्यात येईल.

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना नामनिर्देशन पत्रासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 10 च्या पोट कलम (1क) आणि 30-1क आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 12 (क), 42 (6-क), 67 (7-क) मधील तरतुदीनुसार निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिनांक 31 डिसेंबर 2022 किंवा त्यापूर्वीचा असेल.

मात्र, नामनिर्देशन भरण्याच्या दिनांकापूर्वी ज्या व्यक्तीने आपल्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी पडताळणी समितीकडे अर्ज केला असेल परंतु नामनिर्देशन पत्र भरण्याच्या दिनांकाला त्या व्यक्तीस वैधता प्रमाणपत्र मिळाले नसेल अशी व्यक्ती ती निवडून आल्याचे घोषित झाल्यापासून 12 महिन्याच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचे हमीपत्र देईल. त्यात कसूर झाल्यास त्या व्यक्तीची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्यात यावी अशी तरतूद देखील करण्यास आज मान्यता देण्यात आली.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post
Devendra_Fadnavis

अवघ्या 5 दिवसांचं तोकडं अधिवेशन’, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

Next Post
Uddhav Thackeray & Corona

आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत हवाई प्रवाशांची अद्ययावत माहिती मिळाल्यास संसर्गाला रोखणे सोपे जाईल –  ठाकरे

Related Posts
कल्याण प्रकरणातील नराधमाला अटक; अल्पवयीन मुलीवर आधी अत्याचार केले आणि मग पत्नीसह ...

कल्याण प्रकरणातील नराधमाला अटक; अल्पवयीन मुलीवर आधी अत्याचार केले आणि मग पत्नीसह …

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या (Kalyan Crime News) करणाऱ्या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.…
Read More
"इंदिरा गांधीदेखील स्वर्गातून खाली उतरल्या, तरी कलम 370..", अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा

“इंदिरा गांधीदेखील स्वर्गातून खाली उतरल्या, तरी कलम 370..”, अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. महाविकास आघाडीचे रूपांतर…
Read More
लल्लाट

तमाशा मधील लावणीवर नाचणाऱ्या मुलीच्या प्रेमाची व्यथा मांडणारा ‘लल्लाट’

मुंबई -मागील काही दिवसात रोहित राव नरसिंगे लिखित आणि दिग्दर्शित यांचा स्टोरी ऑफ लागीर चित्रपट मराठी टेलिव्हिजन वर…
Read More