महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

Uddhav Thackeray

मुंबई – कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या पदांसाठी निवडणुक लढविण्याच्या संधीपासुन वंचित रहावे लागू नये यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेनंतर काढण्यात येईल.

मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्याकरीता राखीव असलेल्या जागेसाठी निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने नामनिर्देशन पत्राबरोबर, सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे करण्याची तरतूद आहे.

तथापि, जात पडताळणी समित्यांकडील कामाच्या भारामुळे केवळ वेळेत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे, उमेदवारांना राखीव पदांसाठी निवडणूक लढविण्याच्या संधीपासून वंचित रहावे लागू नये यासाठी उपरोक्त सर्व अधिनियमांत यापूर्वीच सुधारणा करुन महानगरपालिका/नगरपरिषदांच्या सार्वत्रिक/ पोटनिवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र भरताना संबंधित उमेदवारांना वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची 12 महिन्यांची मुदत हमीपत्रावर देणे अशी तरतूद करण्यात आली होती.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post
Uddhav Thackeray & Corona

आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत हवाई प्रवाशांची अद्ययावत माहिती मिळाल्यास संसर्गाला रोखणे सोपे जाईल –  ठाकरे

Next Post
bacchu kadu

‘मंत्र्याच्या ड्रायव्हरला ४० हजार पगार अन् एसटी कर्मचाऱ्याला फक्त १२ हजार हे चुकीचं’

Related Posts
३१ मार्चपूर्वी करुन घ्या 'पॅन-आधार लिंक', नाहीतर पगार मिळायलाही अडचणी येतील! जाणून घ्या प्रोसेस

३१ मार्चपूर्वी करुन घ्या ‘पॅन-आधार लिंक’, नाहीतर पगार मिळायलाही अडचणी येतील! जाणून घ्या प्रोसेस

इनकमटॅक्स डिपार्टमेंट जवळपास ४ वर्षांपासून पॅन-आधार लिंक करण्यासाठी मोहिम राबवत आहे. परंतु पुन्हा पुन्हा सांगूनही अनेक लोक याकडे…
Read More
Car Servicing In Rainy Days: पावसात गाडीची सर्व्हिसिंग करणे कितपत योग्य आहे? करावा लागू शकतो या अडचणींचा सामना

Car Servicing In Rainy Days: पावसात गाडीची सर्व्हिसिंग करणे कितपत योग्य आहे? करावा लागू शकतो या अडचणींचा सामना

Car Servicing In Rainy Days: पावसाळ्यात तुमच्या कारची सर्व्हिसिंग करणे थोडे आव्हानात्मक असते. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये हे आवश्यक…
Read More
सूरजपाल अम्मू

‘भोंग्यावरुन हायकोर्टाने दिलेला आदेश ज्या मशिदी पाळत नसतील त्या मशिदींचे माईक तोडा’

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याची सभेची चर्चा आणि पडसाद अद्याप उमटत आहेत. मशिदीवरचे…
Read More