फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या ब्लू टिक साठी सुद्धा आता पैसे मोजावे लागणार

 नवी दिल्ली –  ट्विटर पाठोपाठ आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागणार आहे. वेबसाईटवर ते वापरणार असाल तर महिन्याला 993 रुपये आणि आयफोन साठी 1241 रुपये निश्चित करण्यात आले आहेत.

रविवारी (19 फेब्रुवारी) मार्क झुकरबर्गने फेसबुक पोस्टद्वारे सबस्क्रिप्शन सेवेची माहिती दिली.  या आठवड्यात आम्ही मेटा व्हेरिफाईड लॉन्च करत आहोत, एक सबस्क्रिप्शन सेवा जी तुम्हाला तुमचे खाते सरकारी आयडीसह सत्यापित करू देईल, असे झुकरबर्गने पोस्टमध्ये लिहिले आहे. वेब-आधारित पडताळणीसाठी वापरकर्त्याला दरमहा $11.99 (रु. 992.36) द्यावे लागतील. आणि iOS वरील सेवेसाठी प्रति महिना $14.99 (रु. 1240.65).

मार्क झुकरबर्गने सांगितले की, मेटाचे हे फीचर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये या आठवड्यात सुरू होईल. याशिवाय इतर देशांमध्येही ही सेवा लवकरच सुरू होणार आहे. ही सेवा भारतात कधी सुरू होईल आणि जुने सत्यापित खातेधारक या सेवेत येतील की नाही याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.