फडणवीस साहित्य संमेलनास उपस्थित राहणार, महापौर कुलकर्णीही सक्रिय सहभाग नोंदविणार – भुजबळ

chagan bhujbal

नाशिक :- नाशिकमध्ये होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत नावावरून निर्माण झालेल्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार असून महापौर सतीश कुलकर्णी साहित्य संमेलनात सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व महापौर सतीश कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत त्यांच्याशी चर्चा केली. या दोघांनीही साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे.

नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनास नाशिक महानगरपालिकेकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जात असून निधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नाशिकचे साहित्य संमेलन हे आपणा सर्वांचे साहित्य संमेलन असून सर्वांच्या सहभागाशिवाय हे यशस्वी होणार नाही. त्यामुळे नाशिककर म्हणून संमेलन यशस्वी करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तसेच महापौर म्हणून संमेलनासाठी येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचे स्वागत करावे लागणार आहे. त्यामुळे आपण या संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना केले.

राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार असल्याचे भुजबळांना सांगितले तर महापौर सतीश कुलकर्णी हे कार्यक्रमांत सहभागी राहणार असल्याचे सांगितले आहे.

Previous Post
rain

आंध्र प्रदेशला पुराचा बसला फटका; शेतीसह पशुधनाचीही झाली मोठी हानी 

Next Post
narendra modi

India Q2 GDP Data : सलग दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकास दर वाढला

Related Posts
शासन आपल्या दारी उपक्रमाला कसबा मतदारसंघात उस्फुर्त प्रतिसाद

शासन आपल्या दारी उपक्रमाला कसबा मतदारसंघात उस्फुर्त प्रतिसाद

Hemant Rasne: शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अनेकवेळा नागरिकांना संपूर्ण माहिती नसल्याने अडचणी येतात, हे लक्षात घेत आज भारतीय…
Read More
Devendra Fadnavis | नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी, देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार

Devendra Fadnavis | नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी, देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार

नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपालांचे…
Read More
KFC India | केएफसीच्या नवीन समर ब्रेव्हरेजेस ने आता मिळवा उन्हाळ्यापासून मुक्ती

KFC India | केएफसीच्या नवीन समर ब्रेव्हरेजेस ने आता मिळवा उन्हाळ्यापासून मुक्ती

KFC India | ~ चार ताजेतवाने करणारे पर्याय- क्रश लाईम, व्हर्जिन मोईतो, मसाला पेप्सी आणि माऊंटेन ड्यू मोईतो~…
Read More