‘हा माणूस मला नेहमीच डॅंबीस आहे असा संशय होताच, आता त्याने ते सिध्द केलंय’

पुणे :  मी व नथुराम हे प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांचं पुस्तक आहे.या पुस्तकावरून अनेकदा वाद निर्माण झाला आहे. अशातच आता शरद पोंक्षे यांची एक फेसबुक पोस्ट (Facbook Post) प्रचंड वेगानं सध्या व्हायरल होतं आहे.

शरद पोंक्षे लिखीत मी व नथुराम या पुस्तकाची मागणी बाजारात मागणी आहे. या मागणीच्या जोरावरच तर पोंक्षे यांच्या पुस्तकाच्या 7 आवृत्त्या विकल्या गेल्या आहेत. परिणामी ब्राम्हण महासंघाच्या विनंतीनं शरद पोंक्षे यांनी आपल्या 8 व्या आवृत्तीचं प्रकाशन पुणे येथे ठेवलं होतं. यासाठी पोंक्षे यांना ब्राम्हण महासंघातर्फे कार्यक्रमाचं आयोजन करत असल्याचं सांगण्यात आलं होतं.

ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी पोंक्षे यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. पण कार्यक्रम होऊन एक महिना उरकला तरी  एका हाॅटेलचं बिल दवे यांनी दिलं नसल्यानं पोंक्षे चांगलंच नाराज झाले आहेत. पोंक्षे यांनी फेसबुक पोस्ट करत आपली नाराजी बोलून दाखवली आहे. हा माणूस मला नेहमीच डॅंबीस आहे असा संशय होताच त्याने ते सिध्द केलंय, असंही ते म्हणाले आहेत. परिणामी आता मी व नथुरामचे लेखक शरद पोंक्षे यांनी नव्या वादाला सुरूवात केली आहे.

sharad ponkshe

दरम्यान, शरद पोंक्षे आणि आनंद दवे यांच्यात जोरदार वाद रंगला आहे. आनंद दवे यांच्याबरोबर कोणताच व्यवहार करू नये असं आवाहन शरद पोंक्षे यांनी केलं आहे. अशारितीनं मी व नथुराम हे पुस्तक पुन्हा वादात अडकलं आहे.