गेल्या काही महिन्यांपासून (Tamil actor divorce) जयम रवी आणि आरती यांच्यात काही ठीक नसल्याच्या बातम्या येत होत्या. दोघेही लवकरच वेगळे होणार असल्याची चर्चा होती. आता अभिनेत्याने एका पोस्टद्वारे अफवांना पुष्टी दिली.
जयम रवी यांने इंग्रजी आणि तमिळमध्ये (Tamil actor divorce)पोस्ट केली आणि लिहिले की, आरतीसोबतचे त्याचे १५ वर्ष जुने वैवाहिक जीवन संपवणे हा दोघांचा परस्पर निर्णय आहे. वैयक्तिक कारणामुळे घटस्फोट घेतल्याचे त्यांनी सांगितले. जयम रवी याने लिहिले की, खूप विचार केल्यानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जो सर्वांच्या हिताचा आहे.
மனைவியை பிரிவதாக நடிகர் ஜெயம் ரவி அறிவிப்பு!#JayamRavi | #AartiRavi pic.twitter.com/JXrU7ueAJ7
— Kollywood Cinima (@KollywoodCinima) September 9, 2024
या कठीण काळात चाहत्यांना त्याच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन अभिनेत्याने केले आहे. तसेच ‘कोणतेही आरोप करू नयेत, चिखलफेक करू नये’ असेही लिहिले आहे. जयम रवीने २००९ मध्ये टीव्ही निर्माती सुजाता विजयकुमार यांची मुलगी आरती रवीशी लग्न केले. जेव्हा ती स्कॉटलंडमध्ये शिक्षण घेत होती तेव्हा ते जवळ आले आणि डेटिंग सुरू केले. लग्नानंतर त्यांना आरव आणि अयान अशी दोन मुले झाली.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मंकीपॉक्सचा भारतात प्रवेश! परदेशातून परतलेल्या व्यक्तीमध्ये लक्षणे आली आढळून
‘विनेश-पुनिया प्रकरणावर शांत राहा…’, भाजप हायकमांडची ब्रिजभूषण यांना सूचना
मुंबईत उबाठाला खिंडार! आतापर्यंत ५५ नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश