चाहत्यांनी ‘मलायका अरोरा’ची ‘चोरी’ पकडली…

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही इंडस्ट्रीतील सर्वात स्टायलिश सेलिब्रिटींपैकी एक आहे. तिच्या सौंदर्य आणि स्टाईलला चाहत्यांकडून नेहमीच दाद मिळाली आहे. अभिनेत्री मलायका अरोरा स्टाईल झाल्यावर काय पेहरावा करणार, या गोष्टीची फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, यावेळी असे काही घडले आहे की, लोक त्याला कॉपी कॅट म्हणू लागले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण… चला तर पाहुया….

अभिनेत्री मलायका अरोरा एका शोच्या शूटिंगसाठी मुंबई फिल्मसिटीमध्ये स्पॉट झाली होती. मलायका अरोराचे कपडे पाहून लोकांना शहनाज गिलची आठवण झाली. शहनाज गिलनेही सोना-सोना गाण्यात असाच ड्रेस परिधान केला होता.

मलायका अरोराला या ड्रेसमध्ये पाहून लोक तिला कॉपी कॅट म्हणू लागले आहेत.या ड्रेसमुळे मलायका अरोरा आणि शहनाज गिलच्या फॅन्समध्ये भांडण झाले आहे. दोन्ही अभिनेत्रींचे चाहते त्यांच्या आवडत्या नायिकेला सुंदर म्हणत आहेत.