शेतकरी आत्महत्या हा आजचा विषय नाही; कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचं बेताल वक्तव्य

मुंबई –  कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये केल्याने चर्चेत येत असता. आता त्यांनी शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात असे वक्तव्य केले आहे.  शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात असे वक्तव्य सत्तार यांनी केले आहेत.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करण्यात आली असल्याचं देखील सत्तार म्हणाले. माझ्या मतदारसंघात फिरुन आलो. शेतीचं फार काही नुकसान झालेलं नाही, असं सांगताना जिथे नुकसान झालंय तिथे पंचनाम्याचे आदेश दिले आहेत, असं ते म्हणाले.

तर अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीतून सत्तार यांचा सोयगाव तालुका वगळण्यात आला आहे. यावर बोलताना सत्तार म्हणाले की, मी आज सोयगावला जाऊन पाहणी केली. दिवसभर सोयगाव तालुक्यात होतो. शेतीचे फार नुकसान झाले नाही. मात्र जे काही नुकसान झाला आहे त्याबाबत पंचनामे करण्याचे कृषी विभागाला सांगितले गेले आहे. अजून अहवाल देण्यात आलेला नाही. त्यामुळे झालेल्या नुकसानीच शेतकऱ्यांना भरपाई मिळणारच असेही सत्तार म्हणाले.