Vijay Wadettiwar | महायुतीच्या अपयशी कारभारामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच, वडेट्टीवार यांचा आरोप

Vijay Wadettiwar | महायुतीच्या अपयशी कारभारामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच, वडेट्टीवार यांचा आरोप

Vijay Wadettiwar | मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. पिंपळखुंटा या गावातील विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेती गहाण ठेऊन काढलेल्या कर्जाचे बँक पैसे देत नाही. बँक मॅनेजरने कर्जाचे पैसे खात्यात जमा करायला टाळाटाळ केल्यामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा हा गंभीर आरोप आहे. या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत महायुती सरकारच्या अपयशी कारभारामुळे आत्महत्या सुरु असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली. त्याचबरोबर दाभाडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी दिला.

छत्रपती संभाजीनगर येथील पिंपळखुंटा गावातील विठ्ठल नामदेव दाभाडे वय ५२ वर्ष यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. एका खाजगी बँकेकडे चार महिन्या पूर्वी शेती तारण ठेवून कर्ज मागणी केली असता बँकेने शेती गहाण ठेवून चार पाच महिने झाले तरी बँकेचे शाखाधिकारी पैसे खात्यावर टाकण्यासाठी टाळाटाळ करत राहिले. त्यामुळे निराश होऊन दाभाडे या शेतकऱ्यांने आत्महत्या केली. विठ्ठल दाभाडे यांनी आत्महत्या करताना चिठ्ठी लिहली असून यामध्ये बँक मॅनेजर पैसे द्यायला टाळाटाळ करत असल्याचे म्हटले आहे. आता मी खचलो..मी माझ्या नशिबावर नाराज आहे. कर्ज मंजूर होऊन तब्बल चार महिने कर्जाची रक्कम खात्यात टाकली नाही, असे या चिट्ठीत म्हटले आहे. बँक मॅनेजर आणि एजंट पैसे मागत असल्याची देखील तक्रार दाभाडे कुटुंबीयांची आहे.

हे प्रकरण गंभीर असून महायुती सरकारचे हे अपयश आहे. सरकारने या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे, आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Adv. Dharmapal Meshram | माफी नाही, कठोरातील कठोर कारवाई करा

Adv. Dharmapal Meshram | माफी नाही, कठोरातील कठोर कारवाई करा

Next Post
Vijay Wadettiwar | जवखेडच्या संत्रे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार; वडेट्टीवार यांचा इशारा

Vijay Wadettiwar | जवखेडच्या संत्रे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार; वडेट्टीवार यांचा इशारा

Related Posts
कॉमेडियन सुनील पाल खरंच बेपत्ता झाला का? पत्नीने मुंबई पोलिसांकडे मागितली मदत

कॉमेडियन सुनील पाल खरंच बेपत्ता झाला का? पत्नीने मुंबई पोलिसांकडे मागितली मदत

कॉमेडियन आणि अभिनेता सुनील पाल (Sunil Pal) गेल्या 24 तासांपासून बेपत्ता होते. सुनील पाल यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार…
Read More
Ajit Pawar

ही काय धर्मशाळा आहे का ? कोणीही कसेही वागायला?; विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात पुन्हा संतापले

मुंबई – सभागृहाचे कामकाज सुरु असताना अनेक सत्ताधारी सदस्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना गराडा घालून आपल्या अर्जावर शेरे व…
Read More
Loksabha Election | लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांच्या 'महाविजय संकल्प सभे'चे आयोजन

Loksabha Election | लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांच्या ‘महाविजय संकल्प सभे’चे आयोजन

Loksabha Election | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविजय…
Read More