भारतीय संघाला मोठा धक्का; दुखापतीमुळे दोन महत्वाचे खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या T20I मालिकेतून बाहेर

नवी दिल्ली-  श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि फलंदाज सूर्यकुमार यादव यांना श्रीलंकेविरुद्धच्या आगामी T20I मालिकेतून वगळण्यात आले आहे.ते आता त्यांच्या दुखापतींच्या पुढील उपचारांसाठी बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे जातील.

दरम्यान, कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान चहरला दुखापत झाली होती. चहर इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) फिट होतो की नाही हे पाहणे बाकी आहे. आयपीएलचा पुढील हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की,  पकर्णधार जसप्रीत बुमराह आधीच संघात सामील झाला असल्याने संघाने कोणताही पर्याय विचारला नाही.  श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेला गुरुवारी लखनऊमध्ये सुरुवात होत आहे. फेब्रुवारीपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये होणार आहे.

दोन्ही संघांचे रेकॉर्ड बघितले तर टीम इंडियाचा यात वरचष्मा दिसतो. 2009 पासून भारत आणि श्रीलंका यांच्यात एकूण 22 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान टीम इंडियाने 14 सामने जिंकले आहेत. तर 7 सामन्यांत त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताची विजयाची टक्केवारी ६६.६६ आहे. तर 7 सामने जिंकणाऱ्या श्रीलंकेच्या संघाची विजयाची टक्केवारी 33.33 आहे.

भारताचा T20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.