Ferguson College : फर्ग्युसन महाविद्यालयात सावरकरांना अभिवादन

Ferguson College : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (Ferguson College) वसतिगृहातील त्यांचे वास्तव्य असणाऱ्या खोली नागरिकांना अभिवादनासाठी खुली ठेवण्यात आली होती.  अभिवादनासाठी नागरिकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती.

डीईएसचे माजी अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, संचालक मिलिंद कांबळे, प्रा. प्राजक्ता प्रधान, उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर, प्रा. सुभाष शेंडे, डॉ. ज्ञानेश्वर कुंभार, डॉ. सविता केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रवास या खोलीत चित्रबद्ध करण्यात आला होता. पुणे विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठाची डी. लिट. पदवी स्वीकारताना सावरकरांनी परिधान केलेले झगे आणि त्यांच्या वापरातील विविध वस्तू आकर्षण ठरत होत्या.

फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना 1902 ते 1905 या कालावधीत सावरकर या वसतिगृहात वास्तव्यास होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Atul Londhe | राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला, गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे का नाही?

Ajit Pawar | निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये

Pramod Bhangire | पुण्यातील रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करा, प्रमोद भानगिरेंची मागणी