घर बसल्या करा इनकम टॅक्स रिटर्न फाइल

इनकम टॅक्स रिटर्न फाइल करणे अतिशय गरजेचे आहे. ही फाइल करण्याचे दोन पर्याय आहे. स्वता प्रत्यक्ष जाऊन टॅक्स रिटर्न फाइल करणे किंवा ऑनलाइन टॅक्स रिटर्न फाइल करणे. ऑनलाइन रिटर्न फाइल करण्याच्या पद्धतीला ई-फाईलिंग म्हणतात. www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जा आणि तिथे ई- फायलिंग करता येते. तिथे अनेक प्रकारचे फॉर्म असतात. त्यातील योग्य फॉर्म निवडा. यासाठी तुम्हाला आधी टॅक्स स्लॅब विषयी माहिती असणे गरजेचे आहे. ई फाइल करण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड काढणे अतिशय गरजेचे आहे. मागील लेखात आपण पॅन कार्ड कसे काढतात हे पाहिले होते. पॅन कार्ड, फॉर्म क्रमांक 16 , पगाराची पावती इत्यादी कागदपत्रे लागतात. ही आधी तयार ठेवा.

पहिल्यांदा जर टॅक्स फाइल करत असाल तर आयकर विभागाच्या एका वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचे खाते उघडणे गरजेचे आहे. www.incometaxindiaefiling.gov.in यावर रजिस्टर करा. तुमचा पॅन कार्ड नंबर तुमचा युजर आयडी असेल. या बरोबरच फॉर्म क्रमांक 16, क्रमांक 26, बँकेचे स्टेटमेंट, मागील वर्षी जर काही कर भरला असेल तर त्यांची पावती ही कागद पत्रे तयार ठेवा. तिथे डाऊनलोड टॅबवर जावा आणि आयटीआर प्रिपरेशन सॉफ्टवेअर डाऊन लोड करा. या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही रिटर्न तयार करा.

प्री फील बटणावर क्लिक करा. तिथे सर्व माहिती लक्षपूर्वक भरा. त्या नंतर कॅलक्युलेट बटणावर क्लीक करा. त्यावरून टॅक्स व इंट्रेस्ट लायबिलीटी आणि टॅक्सची अंतिम रक्कम काढा. जर मागील काही टॅक्स बाकी असेल तर तो भरा. त्या नंतर तुमचा टॅक्स पेएबल होईल. सर्व माहिती नीट भरलेली असेल तर आयटीआर डेटा xml फॉर्ममॅट फाईल सेव्ह करा. आता अंतिम ई- फायलिंग वेबसाईटवर जा तिथे जाऊन ई फाइल ऑप्शनवर जा. अपलोड रिटर्नवर क्लिक करा.

आईटीआर क्रमांक, असेसमेंट वर्ष आणि आधी सेव्ह केलेली xml फाइल हे सर्व निवडा. तुमच्या डिजिटल सहीचे सर्टिफिकेट अपलोड करा. आणि सबमिट पर्याय निवडा. अशा प्रकारे ही प्रक्रिया पूर्ण होईल. आता जोडलेली कागदपत्रे आणि डिजिटल सही केलेला आईटीआर फॉर्म आयकर विभाग सीपीपी बेंगलोर यांना 120 दिवसाच्या आत पाठवा.