Film review : ‘डॉक्टर-जी’ स्त्री रोग तज्ञ असणाऱ्या पुरुष डॉक्टरची कथा आणि व्यथा

Prafulla Patil :  आपल्याकडे अजूनही म्हणजे एकविसाव्या शतकात महिलांना पुरुष डॉक्टरसमोर बऱ्याच पर्सनल गोष्टी बोलायला संकोच वाटतो. तर विचार करून बघा स्त्री- रोगतज्ञ त्यातल्यात्यात प्रसूतीशास्त्र तज्ञ जर पुरुष डॉक्टर असेल तर किती महिला आणि त्यांचे कुटुंबीय त्या डॉक्टरकडून डिलिव्हरी करून घेतील. याच थीमला धरून आयुष्यमान खुरानाचा (Ayushmann Khurrana) ‘डॉक्टर – जी’ (Doctor – G) हा सिनेमा आज रिलीज झालाय.

या सिनेमाची स्टोरीलाईन मध्यप्रदेशातील भोपाळ शहरात राहणाऱ्या डॉक्टर उदय गुप्ता ( आयुष्यमान खुराणा ) याच्या एमबीबीएस नंतरच्या पोस्ट – ग्रँज्यूएट एडमिशन आणि एडमिशन नंतर घडणाऱ्या घटनांचे अप्रतिम मिश्रण आहे.पोस्ट – ग्रँज्यूएट इंट्रान्स परीक्षेत ऑल इंडिया रँकिंगमध्ये पाचशेपेक्षा खालची रँक डॉ.उदयला मिळते ऑर्थोपेडिक्सला ॲडमिशन मिळेल अशी अपेक्षा असताना रँक कमी आल्यामुळे त्याला फक्त आणि फक्त गायनॉकोलॉजीचाच ऑप्शन उरतो आणि तो त्या विभागात दाखल होतो.

गायनॉकोलॉजी विभागाच्या विभागप्रमुख डॉ.नंदिनी श्रीवास्तव ( शेफाली शहा ) या प्रचंड स्ट्रिक्ट असतात कामात कसूर केलेलं त्यांना अजिबात आवडत नाही. नेमकी हीच बाब डॉ. उदयच्या बाबतीत अडचणीची ठरते. कारण मार्क्स कमी मिळाल्यामुळे नाईलाजाने आपण या विभागात आहोत. पुढच्या वर्षी पुन्हा इंट्रान्स देऊन आपल्याला या विभागातून कटायचं आहे हेच टार्गेट ठेऊन तो या विभागात आलेला असतो. त्यातून आपसूकच त्याचं पाट्या टाकू काम सुरू असतं.नेमकं याच काळात त्याची सिनियर डॉ.फातिमा सिद्दीकी (रकुल प्रीत सिंह) त्याच्या आयुष्यात येते आणि डॉ.उदय सेंसियर होत कामाला लागतो.

टाईमपास डॉ.उदय ते सेंसियर डॉ.उदय हा त्याचा पुढचा रंजक प्रवास जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर एकदा नक्कीच चित्रपट गृहात जाऊन बघण्यालयाक हा चित्रपट आहे. बाकी अक्टिंगच्या बाबतीत सांगायचं झालं तर आयुष्यमान खुराणा,शेफाली शहा,रकुल प्रीत सिंह आणि शीबा चढ्ढा ( डॉ. उदयची आई) यांची ॲक्टिंग कमाल आहे. उर्वरित सगळेच छोटे – मोठे कलाकार ॲक्टिंगच्या बळावर लक्षात राहून जातात. इंटरव्हलपर्यंत हळुवार जाणारं कथानक पुढच्या भागात ज्या वेगानं सरकत जातं ते जरा अंगावर येतं. सनत मिश्राचं डिरेक्षण अप्रतिम आहे. अनुभूती कश्यपचे डायलॉग म्हणजे नाद आहेत. बाकी गाणी ठीक – ठाक म्हणावी अशीच आहे. एकंदरीत विकेंडला दोन – अडीच मस्त मेजवानी या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे.

मेडिकल ड्रामा म्हणून बहुप्रतिक्षित असलेल्या या चित्रपटाकडून लोकांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. नक्कीच हा चित्रपट त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करेल अशी आशा आहे.