Scholarship Examination | पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध

Scholarship Examination | पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Examination) (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या परिषदेच्या https://www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Examination) (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल ३० एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला होता. या निकालाच्या अनुषंगाने ३० एप्रिल ते १० मे २०२४ या कालावधीत संबंधित शाळेमार्फत गुणपडताळणीसाठीचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. गुणपडताळणीचे अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीही तयार करण्यात आली आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इ. ५ वी) परीक्षेस नोंदणी केलेल्या ५ लाख १० हजार ६७२ विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ९२ हजार ३७३ उपस्थित राहिले. त्यापैकी १ लाख २२ हजार ६३६ विद्यार्थी पात्र ठरले. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) परीक्षेस नोंदणी केलेल्या ३ लाख ८१ हजार ५८८ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ६८ हजार ५४३ उपस्थित राहिले. त्यापैकी ५६ हजार १०९ विद्यार्थी पात्र ठरले. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ. ५ वी) पात्र विद्यार्थ्यांपैकी मंजूर संचाच्या आधारे १६ हजार ६९१ तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ. ८ वी) पात्र विद्यार्थ्यांपैकी मंजूर संचाच्या आधारे १४ हजार ७०३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.

या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास अंतिम निकाल परिषदेच्या संकेतस्थळांवर वैयक्तिकरित्या स्वतःचा बैठक क्रमांक टाकून पाहता येणार आहे. तसेच शाळांना त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येणार आहे. तथापि, शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्याचे गुणपत्रक त्याच्या बँक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता किंवा डाऊनलोड करता येणार नाही. संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्याला स्वतःचा शिष्यवृत्ती संच प्रकार (अर्हता) पाहता येणार आहे. छापील गुणपत्रक आणि प्रमाणपत्र शाळांना पाठविण्यात येणार आहे.

संकेतस्थळावरील प्रसिद्ध करण्यात आलेली शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती, तसेच इतर अनुषंगिक माहितीच्या लिंक ‘अंतिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी)’, ‘गुणवत्ता यादी (राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय)’ ‘शाळा सांख्यिकीय माहिती (जिल्हानिहाय, तालुकानिहाय)’ अशा आहेत. विद्यार्थी, पालक, शाळा, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना लिंकवर क्लिक करून माहिती डाऊनलोड करता येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Collector Dr. Suhas Diwase | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी मोहिम राबवा

Collector Dr. Suhas Diwase | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी मोहिम राबवा

Next Post
Dheeraj Ghate | आम्हाला कर्म शिकवण्याचा तुम्हाला अधिकार नाही; धीरज घाटेंचे काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांना प्रत्युत्तर

Dheeraj Ghate | आम्हाला कर्म शिकवण्याचा तुम्हाला अधिकार नाही; धीरज घाटेंचे काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांना प्रत्युत्तर

Related Posts
उदय सामंत

किती खोटं बोलायचं याला काही मर्यादा असतात, आदित्य ठाकरेंच्या टीकेला उदय सामंतांनी दिलं प्रत्युत्तर

मुंबई : वेदान्त-फॉक्सकॉन(Vedanta-Foxconn) आणि टाटा एअरबस(Tata Airbus) हे दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले…
Read More
सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे- shivraj singh chouhan

सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे- shivraj singh chouhan

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान ( shivraj singh chouhan) यांनी काल संसदेत स्पष्ट केलं की, शेती…
Read More

ओबीसी आरक्षणाचा लढा केवळ भुजबळसाहेब लढू शकतील व न्याय मिळवून देऊ शकतील – सुळे

मुंबई – लोकसभेत आपल्या पक्षाचे खासदार सुनील तटकरे, अमोल कोल्हे व मी पूर्णपणे तत्पर आहोत. ओबीसी समाजाचा प्रश्न…
Read More