अखेर नारायण राणे लढाई जिंकले! मुंबई महापालिकेने घेतली माघार

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध राणे कुटुंब असा सामना रंगला असताना आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नारायण राणेंचा बंगला (narayan rane house) पाडण्याचे आदेश मागे घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सरकारचे वकील आशुतोष कुंभकोणी (aashutosh kumbhkoni) यांनी उच्च न्यायालयाला दिली. यामुळे राणेंच्या बंगल्यावरील कारवाई टळली आहे.

राणे यांच्या जुहू येथील आदिश बंगल्यात (Aadish bungalow ) अनाधिकृत बांधकाम केल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने राणे यांना तीन वेळा नोटीस देत अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यात यावे; अन्यथा कारवाई करण्यात येईल असे सांगितले हेाते. त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. आता या प्रकरणी महापालिकेने माघार घेतली आहे.

नारायण राणे यांच्या जुहू (Juhu) निवासस्थानाविरोधात 8 दिवसांत तोडक कारवाईचा अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश मागे घेतला असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. कारणे दाखवा नोटीस न देता जारी केलेल्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राणेंच्या कंपनीने केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी माहिती दिली आहे. राज्य सरकारनं आपले आदेशच मागे घेतल्याचं कळवल्यानं हायकोर्टानं राणेंची याचिका निकाली काढली आहे.