संप मागे : एसटी कामगारांच्या रेट्यापुढे सरकार झुकले; मागण्या मान्य!

संप मागे : एसटी कामगारांच्या रेट्यापुढे सरकार झुकले; मागण्या मान्य!

मुंबई : एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासंदर्भात पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभुमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने दि. 27 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी केली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने दि. 27 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंत्रालयात संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक आयोजित करुन तोडगा काढला.

परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी यासंदर्भात घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने पुकारलेले बेमुदत उपोषण आज मध्यरात्रीपासून 12 पासून मागे घेऊन राज्यभरातील एसटीची वाहतूक सुरळीत सुरु होईल असे आश्वासन महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने जाहीर केले.

या बैठकीत एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडणार आर्थिकभार, कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती यावर सविस्तर चर्चा करुन एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच वार्षिक वेतनवाढीसंदर्भात एसटी महामंडळ सकारात्मक असून याबाबत दिवाळीनंतर बैठक आयोजित करण्यात येईल, असेही अनिल परब यांनी सांगितले.

अनिल परब म्हणाले, एसटी कमचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून एसटी कर्मचाऱ्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता वाढ केल्यामुळे आता महागाई भत्ता 12 टक्क्यावरुन थेट 28 टक्के होणार आहे आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे.

या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी मंदार पोहरे, कर्मचारी व औद्योगिक संबंध खात्याचे महाव्यवस्थापक माधव काळे, वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक सुहास जाधव, मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनवडेकर आदी उपस्थित होते.

https://www.youtube.com/watch?v=GmVj7hqrh5o

Previous Post
दिवाळीत संक्रांत : मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर होणार आंदोलन

दिवाळीत संक्रांत : मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर होणार आंदोलन

Next Post
अजितदादांच्या समर्थनार्थ भारतीय दलित कोब्रा येणार रस्त्यावर...

अजितदादांच्या समर्थनार्थ भारतीय दलित कोब्रा येणार रस्त्यावर…

Related Posts
'या' ३ कारणांमुळे हरला पाकिस्तान, यजमान असूनही भारताकडून लाजिरवाणा पराभव सहन करावा लागला!

‘या’ ३ कारणांमुळे हरला पाकिस्तान, यजमान असूनही भारताकडून लाजिरवाणा पराभव सहन करावा लागला!

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध ( Ind Vs Pak) झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा प्रवास जवळजवळ संपला आहे. त्यांना सलग…
Read More
LokSabha Elections | "देशाची निवडणूक लोकशाही पद्धतीने होते की नाही याची शंका असल्याने लोकसभा निवडणुकीकडे जगाचं लक्ष"

LokSabha Elections | “देशाची निवडणूक लोकशाही पद्धतीने होते की नाही याची शंका असल्याने लोकसभा निवडणुकीकडे जगाचं लक्ष”

LokSabha Elections | देशाची ही निवडणूक लोकशाही पद्धतीने होते की नाही, याबाबत लोकांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे देशातील…
Read More
'मी लग्न करणार नाही, पण...' रश्मिकासोबत लग्न करण्यावर अखेर विजय देवरकोंडाने सोडलं मौन

‘मी लग्न करणार नाही, पण…’ रश्मिकासोबत लग्न करण्यावर अखेर विजय देवरकोंडाने सोडलं मौन

Vijay Deverkonda on wedding with Rashmika Mandhanna: काही काळापूर्वी रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्यात एंगेजमेंट झाल्याच्या अफवा…
Read More