अखेर गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा मुहूर्त ठरला

पुणे : महाराष्ट्रात सिनेगृह खुले करण्याची घोषणा होताच अनेक बहुप्रतिक्षीत सिनेमांच्या रिलीज डेट जाहीर करण्यात आल्या आहेत. संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ आता 18 फेब्रुवारी 2022 रोजी चित्रपटगृहात रिलिज होईल.

आधी आलिया भट्टचा चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ 6 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली असून, 18 फेब्रुवारी 2022 रोजी रिलिज होणार आहे. हा एक क्राईम ड्रामा चित्रपट असणार आहे, हुसैन जैदींच्या कथेवर आधारित आहे. अजय देवगणने या चित्रपटात करीम लालाची भूमिका साकारली आहे.