भौगोलिक चिन्हांकन, मानांकन प्राप्त कृषि उत्पादनांच्या नोंदणी, प्रचार, प्रसिद्धी व मूल्यसाखळी विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य योजना

भौगोलिक चिन्हांकन, मानांकन प्राप्त कृषि उत्पादनांच्या नोंदणी, प्रचार, प्रसिद्धी व मूल्यसाखळी विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य योजना

■ राज्यामध्ये कृषि उत्पादनाकरिता भौगोलिक चिन्हांकन, मानांकन प्राप्त उत्पादनांचे प्रचार, प्रसिद्धी, उत्पादकांची नोंदणी व बाजारसाखळी विकसित करणे यासाठी ४ स्वतंत्र योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

■ लाभार्थी :- शेतकरी, भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांची मालकी असणाऱ्या संस्था.

■ भौगोलिक मानांकन प्राप्त कृषि उत्पादनांचे प्रचार व प्रसिद्धीसाठी, प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजनासाठी अनुदान योजना- एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजनासाठी कमाल मर्यादा १० हजार रूपये प्रति प्रशिक्षण अर्थसहाय्य (किमान १०० शेतकऱ्यांसाठी)

■ भौगोलिक मानांकन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नोंदणी शुल्कासाठी अनुदान योजना – नोंदणी शुल्कापोटी येणाऱ्या खर्चासाठी प्रती लाभार्थी कमाल २०० रूपये मर्यादेपर्यंत अनुदान

संपर्क: महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाची संबंधित विभागीय कार्यालये