कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत  जाणून घ्या कोण आहे पुढे ? 

  कोल्हापूर –  कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्यांदा पोस्टल मतांची मोजणी होईल. दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून तिसऱ्या फेरीपर्यंत जयश्री जाधव आघाडीवर आहेत. जयश्री जाधव 4928 मते, सत्यजीत कदम 2566 मते, तिसऱ्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना 7501 मतांची आघाडी आहे.

दरम्यान,  कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. अण्णांच्या माघारी कोल्हापूरकरांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे. विजयाचं चिन्ह दिसत आहे. अण्णांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी निवडणुकीत उतरले, त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेन, अशी प्रतिक्रिया काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी तिसऱ्या फेरीतील आघाडीनंतर दिली.