राज ठाकरे यांच्यांवर कठोर कारवाई करा; ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यात पोलिसात तक्रार

पुणे : –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांची चांगलीच धुलाई केली. राज ठाकरे शिवाजी पार्कवरील (Shivai Park) गुढीपाडवा (GudhiPadva) मेळाव्यात जबरदस्त फटकेबाजी केली. राज्यातली सध्याची राजकीय परिस्थिती वर भाष्य केले. सोबतच मुस्लीम समाजाच्या बाबत देखील त्यांनी काही वक्तव्ये केली. मात्र आता  पुणे शहरात राज ठाकरे (Raj Thackeray_ यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली गेली आहे.

काय आहे तक्रारीत ?
राज ठाकरे यांनी २२ मार्च रोजी केलेले भाषण हिंदू-मुस्लीम समाजात भांडण लावणार आहे. त्यांच्या भाषणामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण राजकीय दबाबाखाली केले गेले आहे. रमजान महिन्यात केलेल्या या भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राज ठाकरे यांच्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांना यापुढे भाषणासाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी तक्रारदार बाजीद राजाक सय्यद यांनी वाकड पोलीस ठाण्यात केली आहे. टीव्ही 9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.