“निर्मात्याने माझ्या प्रायव्हेट पार्टवर बुक्की मारली, मला मारहाण…”, वरुन धवनसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीचा खुलासा

मुंबई- नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वरुण धवन आणि क्रिती सेनन स्टारर ‘भेडिया’ या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री फ्लोरा सैनीने (Flora Saini) तिच्या आयुष्याबद्दल अनेक गंभीर खुलासे केले आहेत. फ्लोरा सैनीने सांगितले की, जेव्हा ती वीस वर्षांची होती, तेव्हा ती निर्माता गुरंग दोषीसोबत (Gurang Doshi) रिलेशनशिपमध्ये होती. यादरम्यान तिला अनेक यातना सहन कराव्या लागल्या. फ्लोराने आरोप केला आहे की, गुरुंग तिला मारहाण करायचा. इतकंच नाही तर गुरुंगने तिच्या प्रायव्हेट पार्टवर बुक्कीही मारली होती.

व्हिडिओद्वारे सांगितले सत्य
फ्लोराने अलीकडेच ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ नावाच्या पेजचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये फ्लोरा तिच्या पूर्वीच्या नात्याबद्दल बोलताना दिसत आहे. यामध्ये फ्लोरा म्हणते, ‘मी एका प्रसिद्ध निर्मात्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. पण लवकरच परिस्थिती बदलली आणि तो माझा छळ करू लागला. त्याने मला अनेक वेळा मारहाण केली, माझ्या चेहऱ्यावर आणि माझ्या प्रायव्हेट पार्टवरही हाताने बुक्क्या मारल्या. त्याने मला कोणाशीही बोलू दिले नाही आणि माझ्या पोटावर जोरात ठोसा मारला, त्यानंतर मी तिथून पळून गेले.’

यानंतर खऱ्या आयुष्यात परतल्याबद्दल फ्लोरा म्हणाली, ‘मी माझ्या आई-वडिलांच्या घरी गेले आहे. मी प्रेमात होते म्हणूनच आई-वडिलांनी मला थांबवल्यानंतरही मी नात्यात प्रवेश केला. परंतु मी आता हळूहळू त्यातून सावरले आहे. आज मी अभिनय क्षेत्रात परतले आहे आणि मी आनंदी आहे.’

कोण आहे फ्लोरा सैनी?
फ्लोरा सैनी ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भेडिया या चित्रपटात फ्लोरा सैनीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. याआधी फ्लोरा सैनी राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर चित्रपट स्त्री मध्येही दिसली होती. फ्लोरा २४ वर्षांपासून अभिनय जगतात सक्रिय आहे. फ्लोराने १९९९मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर अनेक कन्नड आणि तेलुगू चित्रपटात तिने काम केले. बॉलिवूडच्या बेगम जान, स्त्री आणि भेडियासह अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.