माझ्यासाठी शरीयत संविधानापेक्षा श्रेष्ठ, झारखंडमधील मंत्री बरळला

माझ्यासाठी शरीयत संविधानापेक्षा श्रेष्ठ, झारखंडमधील मंत्री बरळला

रांची | झारखंड सरकारमधील अल्पसंख्याक कल्याण मंत्री हफीजुल हसन अन्सारी (Hafizul Hasan Ansari) यांच्या एका वक्तव्यानं देशाच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवली आहे. अन्सारी यांनी “शरीयत कायदा माझ्यासाठी संविधानाहून श्रेष्ठ आहे” असं म्हणत संविधानाच्या सर्वोच्चतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची टीका होत आहे.

अन्सारी पुढे म्हणाले,

“आम्ही मुसलमान काळजात कुराण आणि हातात संविधान घेऊन चालतो. आम्ही आधी शरीयत मानतो, नंतर संविधान. माझा इस्लाम हेच सांगतो आणि शिकवतो.”

या विधानानंतर भाजपसह एनडीएमधील अनेक पक्षांनी अन्सारी यांच्यावर जोरदार टीका केली असून, अशा वक्तव्यामुळे देशाच्या एकात्मतेवर आणि धर्मनिरपेक्षतेवर आघात होतो, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.

सध्या झारखंडमध्ये सत्तेत असलेल्या हेमंत सोरेन सरकारकडून मात्र अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे सरकारची भूमिका काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीय वर्तुळात चर्चेत असलेलं हे वक्तव्य केवळ राज्यापुरतंच मर्यादित न राहता, राष्ट्रीय पातळीवरही चर्चा आणि वादाचे कारण ठरू लागलं आहे. यामुळे हफीजुल हसन अन्सारी (Hafizul Hasan Ansari) यांच्यावर काय कारवाई होते, याकडे देशाचं लक्ष आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मेहुल चोक्सीच्या अटकेवर खासदार सुप्रिया सुळे यांची लक्षवेधी प्रतिक्रिया

पश्चिम बंगाल वक्फ कायदा विरोधातील हिंसाचार प्रकरणात अटक संख्या 150 वर

पुढे कोणतीही तनिषा भिसेसारखी घटना घडू नये यासाठी पावले उचलणार – Rupali Chakankar

Previous Post
इनोव्हा गाडीच्या डिक्कीतून लटकणाऱ्या हातामुळे खळबळ; आता आले सत्य समोर

इनोव्हा गाडीच्या डिक्कीतून लटकणाऱ्या हातामुळे खळबळ; आता आले सत्य समोर

Next Post
एकनाथ शिंदेंनी खास कारणासाठी घेतली राज ठाकरेंची भेट, चर्चांना उधाण

एकनाथ शिंदेंनी खास कारणासाठी घेतली राज ठाकरेंची भेट, चर्चांना उधाण

Related Posts
Ajit Pawar | संस्थात्मक पिककर्ज प्रणालीबाहेरील आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा

Ajit Pawar | संस्थात्मक पिककर्ज प्रणालीबाहेरील आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा

Ajit Pawar | राज्यातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत…
Read More
"सरकारवर टीका करणाऱ्यांची ट्वीटर अकाउंट ब्लॉक करा, अन्यथा...", शेतकरी आंदोलनावेळी मोदी सरकारने ट्वीटरला धमकावलं

“सरकारवर टीका करणाऱ्यांची ट्वीटर अकाउंट ब्लॉक करा, अन्यथा…”, शेतकरी आंदोलनावेळी मोदी सरकारने ट्वीटरला धमकावलं

ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे माजी सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी मोदी सरकारवर मोठा आरोप केला आहे.…
Read More
राज ठाकरे

राज ठाकरे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा; ‘या’ संघटनेच्या मागणीने खळबळ 

मुंबई –  मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे नव्या वादाला तोंड फुटले…
Read More