पुढील दोन-तीन दिवस तर मी काही जेवणार नाही – अमोल मिटकरी 

मुंबई – विधानपरिषद निवडणुकीसाठी (MLC election) भाजपने आपल्या उमेदरवांची नावे निश्चित (BJP decide four names for MLC Vidhan Parishad Election) केली असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी आपले चार उमेदवार निश्चित केले आहेत. यामध्ये प्रवीण दरेकर (Pravin Darekar), राम शिंदे (Ram Shinde), प्रसाद लाड (Prasad Lad) आणि श्रीकांत भारतीय यांच्यासह उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे.

मावळते आमदार विनायक मेटे, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर यांना उमेदवारी नाकारत भाजपाने बुधवारी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक शब्दांमध्ये यावरुन मेटे आणि खोत यांना लक्ष्य केलंय. त्यांना राजकीय आत्महत्याच करावी लागलीय. भावी उत्तरायुष्यात त्यांचं आयुष्यमान वाढो. त्यांना चांगलं आरोग्य लाभो. लढत राहा, आम्ही तुमच्यासोबत आहोत,असं मिटकरींनी ट्विटरवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये खोत आणि मेटे यांचा उल्लेख करत म्हटलंय.

अशा वाटेवर तुम्हाला फडणवीस इतकं मोकाट सोडतील याची दुरान्वये कल्पना नव्हती. मला तर फार दु:ख झालं आहे. पुढील दोन-तीन दिवस तर मी काही जेवणार नाही. कारण मेटे आणि सदाभाऊ सभागृहात नसले तर सभागृह अगदी खाली झालं आहे,” असं उपाहात्मक वक्तव्यही मिटकरी यांनी या व्हिडीओमध्ये केलंय.