मुख्यमंत्रीपदासाठी मी विचारधारेशी तडजोड नाही, पक्ष बदलणार नाही –  ठाकूर 

Mumbai  :  “ मुख्यमंत्रीपद नाही मिळालं तरी चालेल, पण विचारधारेशी तडजोड करणार नाही. पक्ष बदलणार नाही.” असे सूचक उत्तर देत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (State Minister for Women and Child Development Adv. Yashomati Thakur) यांनी काल झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ कार्यक्रमात आमदार श्वेता महाले पाटील यांची कोंडी केली.

झी मराठीवरील(Zee Marathi)  बहुचर्चित ‘किचन कल्लाकार’ (‘Kitchen Kallakar)  ’या कार्यक्रमात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्यासह राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि भाजपच्या आमदार श्वेता महाले या देखील सहभागी झाल्या होत्या.

यावेळी ॲड. यशोमती ठाकूर, रुपाली चाकणकर, श्वेता महाले (Yashomati Thakur, Rupali Chakankar, Shweta Mahale)  झी मराठी’ वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ मध्ये मिळालेली स्वयंपाकाची संधी आणि महाराज प्रशांत दामले, सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे (Prashant Damle, Host Sankarshan Karhade,) , इतर सहकलाकारांची जुगलबंदी पहायला मिळाली. या कार्यक्रमात स्वयंपाक घरातील साधर्म्य असलेले विविध खेळ, गमती-जंमती, धमाल, मज्जा-मस्तीचा आनंद त्यांनी लुटला. याच दरम्यान एका खेळाचा भाग म्हणून आमदार श्वेता महाले यांना छायाचित्र दाखवून त्याबद्दल बोलण्यास सांगितले होते. यावेळी ॲड. यशोमती ठाकूर यांचे छायाचित्र महाले यांच्यासमोर सादर करताच, त्या म्हणाल्या की ‘राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री, परंतु भाजपमध्ये येऊन!’

श्वेता महाले यांचे हे  वक्तव्य ऐकून मंत्री यशोमती ठाकूर यांनी हसत हसत डोक्यावरती हात मारून घेतला आणि आपली सूचक प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “आमदार श्वेता महाले या माझ्या चांगल्या मैत्रीण आहेत. माझ्याबद्दल एवढं चांगलं त्या चिंततात, माझं चांगलं व्हावं, असं त्यांना नेहमी वाटतं. पण मला मुख्यमंत्रीपद नाही मिळालं तरी चालेल, पण विचारधारेशी तडजोड करणार नाही.” असं सडेतोड उत्तर ठाकूर यांनी दिले. यावेळी प्रेक्षकांमध्ये हास्याची एकच लहर पाहायला मिळाली. तसेच या उत्तराची राजकीय विश्वासह समाज माध्यमांवर एकच चर्चा सुरू असल्याचे दिसून आले.