या कारणसाठी सिंधुताई सपकाळ यांचा दफनविधी करण्यात आला

महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे काल रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी पुण्यात निधन झाले. सिंधुताई यांना प्रेमाने संपूर्ण महाराष्ट्र माई म्हणत. त्या हजारो अनाथांच्या माई होत्या. सिंधुताई यांच्या कविता आणि भाषणे प्रसिद्ध आहेत. सिंधु ताई यांच्या जाण्याने संपूर्ण राज्यातच एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. सिंधुताई यांच्यावर आज दुपारी पुण्यातील ठोसरपागा स्मशानभूमीत महानुभाव परंपरेनुसार दफनविधी करण्यात आला.

सिंधुताई यांचा दफनविधी झाल्यानंतर अनेकांना हा प्रश्न पडला की सिंधुताई आणि महानूभाव पंथ यांचा काय संबंध आहे. फार कमी लोकांना हे माहीत असेल की सिंधुताई या महानूभाव पंथाच्या अनूयायी होत्या. त्या या पंथास मानत. रोज साधना केल्या शिवाय त्या बाहेर पडत नसतं. महानूभाव पंथात जेव्हा व्यक्तीचा मृत्यु होतो, त्यानंतर त्या व्यक्तीला अग्निडाग दिला जात नाही. त्या व्यक्तीला दफन केले जाते.

या मागील कारण असे की जेव्हा व्यक्तीला अग्नि दिला जातो, तेव्हा त्या अग्निमध्ये अनेक जीव-जंतु देखील मारले जातात. महानूभाव पंथ हा अहिंसा या तत्वावर विश्वास ठेवतो.त्यामुळे सिंधुताई सपकाळ या देखील महानूभाव पंथाच्या अनुयायी होत्या,त्यामुळे त्यांचा दफनविधी करण्यात आला.महानूभाव पंथाने सिंधुताई यांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात मोठा आधार दिला होता. त्या काही दिवस त्यांच्या आश्रमात देखील राहिल्या होत्या.