बेवारस ५५ मृतदेहांच्या अस्थींचे विधिवत विसर्जन, राष्ट्रीय कला अकादमीच्यावतीने संगम घाटावर अस्थी विसर्जन

asthi

पुणे : हिंदू धर्मामध्ये अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीच्या अस्थी नदीमध्ये सोडणे बंधनकारक आहे. तरच आत्म्यास मोक्ष प्राप्ती होते. परंतु शहरात विविध कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये अनेक मृतदेह बेवारस असतात. अशा बेवारस मृतदेहांचे अस्थी विसर्जन कोण करणार असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या बेवारस अस्थींच्या विसर्जनासाठी राष्ट्रीय कला अकादमीने पुढाकार घेत तब्बल 11 वर्षे ही जबाबदारी पार पाडली आहे. मृत व्यक्तीची जात किंवा धर्म कोणता हे न बघता, त्या पलीकडे जाऊन अकादमीच्यावतीने या बेवारस अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात आले.

सर्वपित्री अमावास्येनिमित्त राष्ट्रीय कला अकादमी (न्यास) आणि पुणे महानगरपालिका ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाटावर बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन आणि विसर्जन करण्यात आले. यावेळी मंदार रांजेकर,सदाशिव कुंदेन, अमर लांडे, डॉ.मिलिंद भोई, राजाभाऊ टिकार, आय. टी.शेख, नगरसेवक प्रदीप गायकवाड, राजेंद्र काकडे, बाला शुक्ला, किरण सावंत, विक्रम सरोदे,आरोग्य निरीक्षक, भाऊ जाधव मुकादम, पीयुष शाह, किरण सोनिवाल, चेतन शर्मा, सुरेश सकपाळ, विवेक टिळे, अक्षय खिंवसरा, ॲड.चित्रा जानुगडे, दिनेश मुळे, सुषमा खटावकर, मनीषा निंबाळकर, भाई ताम्हाणे, राजेश शिंदे, नितीन जाधव,राजेंद्र धायरकर उपस्थित होते.

सदाशिव कुंदेन म्हणाले, राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने दरवर्षी सर्वपित्री अमावास्येला बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन व विसर्जन केले जाते. उपक्रमाचे यंदा ११ वे वर्ष आहे. बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून त्यांच्या आत्म्यास मोक्ष प्राप्ती यासाठी मंत्रोच्चार आणि अध्यायांचे पठण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=06LGqkPTL38&t=2s

Previous Post
sattar - sabane

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडतील – अब्दुल सत्तार

Next Post
nawab malik

‘मित्रांनो सांगा यामध्ये गुरु कोण आणि घंटाल कोण ?’

Related Posts
terrorist attack

श्रीनगरमध्ये पोलीस बसवर दहशतवादी हल्ला; दोन जवान शहीद, १२ गंभीर जखमी!

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी पोलिसांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी या बसवर जोरदार गोळीबार केला. या हल्ल्यात 14…
Read More

संभाजीराजेंच्या उमेदवारीबाबत राजेश टोपे म्हणाले…

नागपूर : छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांना शिवसेना पुरस्कृत नाहीतर शिवबंधन बांधून (build Shivbandhan) सेनेत प्रवेश केल्यानंतरच…
Read More
"मलाही मुख्यमंत्री...", अजितदादांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या इच्छेवर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया

“मलाही मुख्यमंत्री…”, अजितदादांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या इच्छेवर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया

सोलापूर- नुकत्याच एका मुलाखतीत विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानाची…
Read More