जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन, वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

 नवी दिल्ली – जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मुलीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शरद यादव यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बिहारच्या राजकारणात वेगळी ओळख असलेले शरद यादव यांच्या जाण्याने सर्वांनाच शोककळा पसरली आहे.

त्यांच्या समाजवादी राजकारणामुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय झाले होते. पण आता त्या महान नेत्याने या जगाचा निरोप घेतला आहे. गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात त्यांचे निधन झाले.(Former JDU president Sharad Yadav passed away.).