मुंबई मनपाच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी आज प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

निर्मला सामंत यांच्या प्रवेशाने पक्षाला मुंबई मनपा निवडणुकीत अधिक बळकटी मिळेल असा विश्वास पक्षाचे मुंबई विभागीय अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.

पक्षाच्या अर्बन सेलच्या प्रदेशाध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या मान्यतेने निर्मला सामंत यांची मुंबई विभागीय अर्बन सेल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार विद्या चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, प्रदेश युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, अर्बन सेल प्रदेश सेक्रेटरी सुरेश पाटील, माजी नगरसेविका अल्पना पेंटर आदी उपस्थित होते.

 

Previous Post

अभिनेत्री व फॉर्म्युला फोर कार रेसर ‘मनिषा केळकर’ने अपघातावर मात करत केलं बॉडी ट्रान्सफोरमेशन

Next Post

मावळमध्ये राजकीय भूकंप; दिगग्ज नेत्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

Related Posts
yogi

मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींच्या मुद्द्यावरून योगी आक्रमक; म्हणाले, पंजाब सरकारने…

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) पंजाबच्या (Punjab) फिरोजपूरमध्ये होणारी रॅली (Rally) काल रद्द करण्यात आली. सुरक्षेत…
Read More
शरद पवारांच्या निशाण्यावर छगन भुजबळ; पहिली सभा होणार भुजबळांच्या बालेकिल्ल्यात

शरद पवारांच्या निशाण्यावर छगन भुजबळ; पहिली सभा होणार भुजबळांच्या बालेकिल्ल्यात

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या…
Read More

‘एक दिवस योगी आदित्यनाथ देशाचे पंतप्रधान नक्की होतील अशी आशा आहे’

नवी दिल्ली – आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने अनेकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.…
Read More