तुळजापूरात चार एक्करावरील ऊस जळून खाक, लाखोंचा ऊस आगीत भस्मसात

तुळजापूर शिवारात उस्मानाबाद बायपास परिसरात असणाऱ्या विलास जगदाळे यांच्या शेतातील ऊसास अचानक आग लागली. आग विझवण्यासाठी येत असलेल्या नगरपरिषद अग्नीशामन दलाच्या गाडीत अचानक बिघाड झाल्याने यात सुमारे चार एकर ऊस जळून खाक झाला.
सदरील घटना शनिवार दि २८ रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली. सदरील ऊसाच्या फडास शाँर्टसर्कीट की अन्य कारणामुळे आग लागली? याचे नेमके कारण कळू शकले नाही.

सदरील जळालेल्या उसाचा पंचनामा करण्यात आला आहे. तुळजापूर शिवारातील सर्वे नंबर ६१ मधील विलास जगदाळे यांच्या मालकीचा शेतातील उसास अचानक सकाळी साडेअकरा वाजता आग लागली. नगरपरिषद तुळजापूर अग्नीशमन दलाची गाडी घटना स्थळी आली असता गाडीतील बिघाडामुळे आग विझवणे शक्य न झाल्याने यात चार एक्कर ऊस जळून खाक झाला. शेतकऱ्यांचे लाखो रुपये आगीत भस्मसात झाले. शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कच्च्या वावरात गेल्याने पाणी प्रेशर देणाऱ्या इंजनचा नट तूटल्याने पाणी मारण्यास अडथळा-
सदरील गाडी कच्चा वावरात गेल्याने व्हायब्रेशन झाल्यामुळे पीटीओ इंजनचा नट तुटल्याने पाणी प्रेशर देणारे इंजन न चालू झाल्याने पाणी मारता आले नाही अशी प्रतिक्रिया अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्याने दिली आहे.