मुंबई | राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेतून (Ladki Bahin yojana) आतापर्यंत साडेचार हजार महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. वसुलीची भीती आणि अपात्र ठरण्याची शक्यता यामुळे या महिलांनी ही पाऊले उचलली आहेत.
लाडकी बहीण योजना (Ladki Bahin yojana) जुलै महिन्यात लागू करण्यात आली होती आणि महिलांना याचा लाभ मिळू लागला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर अर्ज आणि दस्तऐवजांच्या फेरतपासणीची प्रक्रिया सुरू होणार असल्याच्या चर्चेमुळे काही महिलांनी भीतीपोटी अर्ज मागे घेतल्याचे समोर आले आहे.
महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साडेचार हजार महिलांनी स्थानिक शासकीय कार्यालयांत अर्ज करून योजना नको असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे त्यांच्या खात्यावर येणाऱ्या रकमेचा हप्ता थांबवण्यात आला आहे.
अर्ज तपासणीदरम्यान अपात्र ठरल्यास योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम दंडासह वसूल केली जाईल या भीतीने महिलांनी ही पाऊल उचलल्याचे समजते. तूर्तास सरकारने अशा प्रकारच्या अर्जांवर दंड न लावण्याचे धोरण ठेवले आहे, मात्र लाभाची रक्कम परत करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
भाजप सत्ताधारी आणि प्रशासनाने मिळून पुण्याची जागतिक नाचक्की करून दाखवली : Aam Aadmi Party
हिंदुत्वाचा अजेंडा नेण्यासाठी भाजप मंत्र्यांना संघाचे नेते कानमंत्र देणार
फडणवीसांनी करुणा शर्माला अनेकदा विमानाने माहेरी सोडलं | Trupti Desai