क्या बात… घराच्या छतावर एकदा लावा ‘हा’ डिवाइस, आयुष्यभर नाही भरावं लागणार लाईट बिल!

वेळेनुसार माणसाच्या सुखसोयी वाढल्या आहेत. आजकाल प्रत्येक घरात फॅन, टिव्ही, एसी, फ्रिज, वॉटर हिटर आणि इत्यादी गोष्टी पाहायला मिळतात. यामुळे वीज बिलही (Electric Bill) भलेमोठे येते. जर तुम्हीही दर महिन्याला मोठा आकडा असलेले वीज बिल भरून हैराण झाला असाल तर आता तुम्हाला बिल भरण्याची गरज नाही. कारण आता तुमच्या घराची वीज पूर्णपणे मोफत मिळणार आहे. हे कसे होईल? याची माहिती बहुतेकांना नाही.

जर तुम्ही विचार करत असाल की आम्ही सौर पॅनेलपासून वीजबिल मोफत बनवण्याविषयी बोलत आहोत, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण तसे नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या घरात फक्त एकच उपकरण बसवून वीज बिल कसे कायमचे थांबवू शकता. महत्त्वाचे म्हणजे, त्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरजही भासणार नाही.

हे उपकरण कोणते आहे?
जर तुम्हाला या उपकरणाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर याला “ट्यूलिप टर्बाइन” (Tulip Turbine/Tulip Wind Turbine) म्हणतात. याद्वारे तुम्ही ते तुमच्या घरी वीज निर्माण करू शकता आणि त्यातून निर्माण होणारी वीज इतकी आहे की तुम्हाला तुमच्या संपूर्ण घराचे वीज बिल मोफत मिळू शकते. थोडक्यात याचा अर्थ असा होतो की तुम्हाला वीज कनेक्शन घेण्याची अजिबात गरज नाही.

आनंद महिंद्रा यांनी भरभरून कौतुक केले
हे मशिन पाहून खुद्द आनंद महिंद्रा सुद्धा आश्चर्यचकित झाले होते. त्यांनी त्याची जोरदार प्रशंसा केली होती. हे मशिन बसवल्यानंतर तुम्हाला विजेची अडचण सहज दूर करता येते. ते बसवल्यानंतर वीज बिलही कमी करता येते. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे मशीन बसवण्याची किंमत लाखोंमध्ये आहे, परंतु ती एकदाच गुंतवणूक करण्यासारखी आहे. एकदा हे मशीन बसवल्यानंतर तुम्हाला सुमारे १५ ते २० वर्षे वीज बिलाचा विचार करण्याची गरज नाही. घरच्या घरी ट्यूलिप टर्बाइन बसवणे खूप सोपे आहे आणि त्याच्या मदतीने तुम्ही वीज बिल मोफत मिळवू शकता.