विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक अँड हॅन्ड सर्जरी शिबिर ७, ८ जानेवारीला

पुणे : अग्रवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्ट आणि आर. एम. धारीवाल फाउंडेशनच्या(Agarwal Club Charitable Trust and Rt. M. Dhariwal Foundation) वतीने विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक अँड हॅन्ड सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (७ जानेवारी) आणि रविवार (८ जानेवारी) या दोन दिवशी हे शिबीर शिरूर येथील मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल येथे होणार आहे.

शिबिराचे हे बारावे वर्ष आहे. आतापर्यंत जवळपास ५०० व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला आहे, अशी माहिती अमेरिका आणि फ्रान्स येथील प्रसिद्ध डॉक्टर पंकज जिंदल आणि अगरवाल ट्रस्टचे अध्यक्ष उमेश अगरवाल (Pankaj Jindal, famous doctor from America and France and Umesh Agarwal, President of Agarwal Trust)यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आर. एम. धारिवाल फाउंडेशनचे उमेश मोहाड, अगरवाल ट्रस्टचे प्रकल्प संचालक उमेश कुमार जालान, राजीव अग्रवाल आदी उपस्थित होते.

प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. शंकर श्रीनिवासन सुब्रह्मण्यम, डॉ. स्वप्ना आठवले, डॉ. प्रशांत केदारी, डॉ. रवींद्र चौहान (Plastic surgery specialist Dr. Shankar Srinivasan Subrahmanyam, Dr. Swapna Athavale, Dr. Prashant Kedari, Dr. Ravindra Chauhan)या शिबिरात शस्त्रक्रिया करणार आहेत. वाकड्या नाकात सुधारणा, हनुवटीच्या आकारात बदल, गोंदण, मस व चेहऱ्यावरील व्रण, जन्मतः असलेले व्यंग, दुभंगलेले ओठ, वाकडी बोटे आदी गोष्टींवर प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जरी करण्यात येणार आहेत. या सर्जरीसाठी स्त्री व मुलींना प्राधान्य देण्यात येणार असून, गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा.

गरजू रुग्णांनी सर्जरी पूर्व तपासणीसाठी ७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ वाजता उपाशी पोटी हजार राहावे. तसेच ५ जानेवारी २०२३ रोजी पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यकी आहे. अधिक माहितीसाठी वंदना पाठक (७५८८१४८८०५), निर्मला मित्तल (९०११००७६६९) किंवा मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल (०२१३८-२२५५९९/२२४५९९ किंवा ८६०५२२५५९९) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.