मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आ. सुभाष देशमुख यांची रुग्णांना 13 लाखांची आर्थिक मदत

सोलापूर – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आमदार सुभाष देशमुख (MLA Subhash Deshmukh) यांनीही यामार्फत गेल्या दोन महिन्यात 16 रुग्णांना तब्बल 13 लाखांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्या सरकारने फेब्रुवारी 2023 मध्ये विक्रमी 10 कोटी 27 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. आमदार सुभाष देशमुख यांचाही मोठा वाटा राहिलेला आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व्यतिरिक्त राज्यातील धर्मादाय संस्था, वैद्यकीय उपचारासाठी मदत करणाऱ्या संस्था यांच्याशी संपर्क करून आ. सुभाष देशमुख यांनी मदत मिळवून दिली आहे. आमदार देशमुख यांनी 16 रुग्णांना विविध आजारांबाबत तब्बल 13 लाखांची मदत मिळवून दिली आहे.

सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध हॉस्पिटलमध्ये रुग्णांना व्यवस्थित उपचार व्हावेत यासह सवलत मिळवून देण्यासाठीही आमदार सुभाष देशमुख यांच्या संपर्क कार्यालयातून मदत केली जात आहॆ. रुग्णांनी आपल्या आजाराबाबत अथवा आर्थिक मदतीसाठी आ.सुभाष बापू देशमुख संपर्क कार्यालय, सह्याद्री हौसिंग सोसायटी, होटगी रोड सोलापूर येथे आरोग्य सहाय्यक यांच्याशी 7720096488 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन आमदार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहॆ.

रुग्णांच्या मदतीसाठी कायम प्रयत्नशील: आ. देशमुख

राज्यातील एकही सर्वसामान्य – गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला पहिल्या दिवशी दिला होता. त्यांच्या सुचनेचे तंतोतंत पालन करण्याचा आणि रुग्णांना दिलासा देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहे, असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.