जल जीवन मिशन अंतर्गत राणीसावरगावला चार कोटींचा निधी मंजूर

राणीसावरगाव/विनायक आंधळे : गंगाखेड (Gangakhed) तालुक्यातील राणीसावरगाव ग्रामपंचायत (Ranisawargaon Gram Panchayat) अंतर्गत जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून चार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. सदरील गावात पुरातन पाणीपुरवठा योजना आहे व इतर योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो, परंतु पूर्णपणे पाणीपुरवठा (Water supply) होत नाही. काही खेडी व तांडे वंचित राहतात. हीच बाब लक्षात घेऊन 2015 साली महाराष्ट्राचे तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) गंगाखेड दौऱ्यावर असताना वरील नळ योजनेतून पाणीपुरवठा होत नसल्याबाबत जुनी नळ योजना पुनर्जीवित करावी. तसेच, या मध्ये वंचित खेडे व तांड्याना पाणी मिळावी यासंदर्भात भारतीय जनता पार्टीचे (BJP) कार्यकर्ते भाजयुमो ता. उपाध्यक्ष गंगाखेड अनिल जाधव, राजेश्वर स्वामी, सोपान जाधव, पाराजी जिल्हेवाढ, पंढरी राठोड आदींनी निवेदन देऊन ग्रामीण भागातील पाणी प्रश्न उपस्थित केल्यानंतर व वेळोवेळी पाठपुरावा करून वरील योजनेला चार कोटी व वाढीव निधी उपलब्ध झाल्याने पाणीटंचाईचा (Water Shortage) जिवाळीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.

वरील निधी मंजूर करण्यासाठी माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, माजी सभापती श्रीनिवास मुंडे, माजी सभापती गणेश दादा रोकडे यांच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करून वरील निधी मंजूर झाला आहे. त्या अनुषंगाने लवकरच निधीच्या माध्यमातून नळ योजनेची काम करण्यात येणार आहे निधी उपलब्ध झाल्याबद्दल भाजप (BJP) कार्यकर्त्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.