वरसोली – पांगळोली येथील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी २ कोटी ६१ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध

वरसोली :- मावळ तालुक्यातील वरसोली व पांगळोली येथील नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामासाठी आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke) यांच्या पाठपराव्यामुळे सुमारे २ कोटी ६१ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, या पाणीपुरवठा योजनांच भूमिपूजन समारंभ बुधवारी (दि.८) महिला-भगिनींच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.(Funds of Rs. 2 crore 61 lakhs available for tap water supply scheme at Versoli-Pangloli)

‘जल जीवन मिशन’ (Jal Jeevan Mission)  अंतर्गत वरसोली नळ पाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी ९९ लक्ष रु.निधी व पांगळोली योजनेसाठी ६२ लक्ष रु.निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या दोन्ही गावातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहचवण्याचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. या निधीतून वरसोली येथे २ लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी अंदाजे सोळा किलोमीटरची वितरण व्यवस्था व पांगळोली येथे ८५ हजार लि.क्षमतेची पाण्याची टाकी व सुमारे तीन किमी पाणी वितरण व्यवस्थेची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.

या भूमिपूजन समारंभप्रसंगी पीएमआरडीए सदस्या दिपाली हुलावळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस मावळ तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, सरपंच सारिका खांडेभरड, माजी पंचायत समिती सदस्य महादु उघडे, माजी नगराध्यक्ष नारायण पाळेकर, संजय खांडेभरड, उपसरपंच सीता ठोंबरे, सदस्य रजनी कुटे, अरुणा खांडेभरड, मिना शिंदे, अरविंद बालगुडे, दत्ता खांडेभरड, विलास चौधरी, बबन खरात, कल्पेश मराठे, उमेश शेळके, साजन दळवी, तसेच आजी-माजी सरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला-भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.