सुषमा अंधारे यांचा उल्लेख ‘काळी मांजर’ असा करत मनसेच्या नेत्याने केली जहरी टीका 

मुंबई-  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गजानन काळे (Gajanan Kale of Maharashtra Navnirman Sena) यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यापासून ते अगदी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे  (sushma andhare)यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना काळी मांजर असा उल्लेख केला आहे. काळी मांजर सारखं आडवी जाते असे म्हणत जोरदार शरसंधान केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका करण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये खासदार संजय राऊत ठेवले होते. आता त्यांना शांत बसवून या हे पार्सल राष्ट्रवादीतून ठाकरे गटाकडे का पाठवलय असा सवालही गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत असो की सुषमा अंधारे असो आता हा पक्ष संपणारच आहे आणि या पक्षात आता उरलेसुरले दोघं बापलेकच राहणार असल्याचे दिसून येणार आहे असा खोचक टोला त्यांनी ठाकरे कुटुंबीयांना लगावला आहे. गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना छोटा नवाब आणि मोठा नवाब म्हणत  टीका केली आहे.