गजानन महाराजांचे जीवन निरपेक्ष भक्तीचे आणि मानवसेवेचे उदाहरण – Kishore Jorgewar

गजानन महाराजांचे जीवन निरपेक्ष भक्तीचे आणि मानवसेवेचे उदाहरण – Kishore Jorgewar

Kishore Jorgewar | गजानन महाराज हे भक्ती, सेवा आणि त्यागाचे प्रतीक होते. त्यांचे विचार आणि शिकवणी आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात. त्यांचे कार्य हे केवळ अध्यात्मापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी समाजात एकात्मतेचा संदेश दिला. त्यांचा गण गण गणात बोते हा मंत्र प्रत्येक भक्ताच्या ओठावर असतो. हा मंत्र आपल्याला कठीण प्रसंगांवर मात करण्याची प्रेरणा देतो आणि आपल्या जीवनाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. गजानन महाराजांचे जीवन हे निरपेक्ष भक्तीचे आणि मानवसेवेचे उदाहरण असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

गजानन महाराज यांच्या प्रकट दिना निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील गजानन मंदिरांमध्ये आमदार किशोर जोरगेवार (Kishore Jorgewar) यांनी गजानन महाराजांचे दर्शन घेतले तसेच घुग्घूस येथे काडण्यात आलेल्या रथयात्रेतही आमदार किशोर जोरगेवार यांनी सहभाग दर्शविला.

स्वावलंबी नगर येथे आयोजित कार्यक्रमात बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, गजानन महाराजांनी मानवतेची शिकवण दिली. त्यांच्या जीवनाचा सारांश सेवा हाच खरा धर्म हा होता. आपणही त्यांच्या या शिकवणीचा अंगीकार करून समाजसेवेत योगदान द्यावे. आजच्या धकाधकीच्या जीवनातही आपण त्यांची शिकवण आचरणात आणली, तर आपले आयुष्य अधिक समाधानकारक होईल. तसेच ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे.

धार्मिक व सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि त्यातून समाजात सद्भावना निर्माण करणे हे खरे भक्तीचे लक्षण आहे. हा दिवस आपल्यासाठी केवळ एक उत्सव नाही, तर श्रद्धा आणि भक्तीचा संकल्प आहे. गजानन महाराजांनी संपूर्ण मानवजातीला प्रेम, सेवा आणि त्यागाचे मार्गदर्शन दिले. त्यांच्या शिकवणींमधून आपल्याला संयम, श्रद्धा आणि मानवसेवेचे महत्त्व कळत असल्याचे ते यावेळी म्हणाले. गजानन महाराज प्रकट दिना निमित्त विविध ठिकाणी धार्मीक कार्यक्रमांचे आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मनसे नेत्यांना शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न? राज ठाकरे संतापले!

शरद पवारांचं राजकारणातलं स्टेटस मोदींपेक्षा मोठं, पंतप्रधानांच्या त्या कृतीनंतर राऊतांची प्रतिक्रिया

आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार? भगव्या स्टेटसने राजकीय चर्चांना उधाण

Previous Post
मधुचंद्रातच वाद; पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल केली

मधुचंद्रातच वाद; पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल केली

Next Post
पक्षातील पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागत;नीलम गोऱ्हेंचा गौप्यस्फोट

पक्षातील पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागत;नीलम गोऱ्हेंचा गौप्यस्फोट

Related Posts
खलिस्तानचा आणि चीनचा बागुलबुवा येत्या निवडणुकीत दाखवला जाणार आहे : P. Sainath

खलिस्तानचा आणि चीनचा बागुलबुवा येत्या निवडणुकीत दाखवला जाणार आहे : P. Sainath

P. Sainath – शेतीची वाताहत, कोविड, आर्थिक विषमता ही भारतासाठी महासंकटे होती, येत्या काळात लोकशाहीची मोडतोड हे महासंकट…
Read More
जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांची मते बाद होणार ?

मुंबई – राज्यसभेच्या राज्यातल्या 6 जागांसाठी आज मतदान होणार आहे. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार (Sanjay Raut…
Read More
एकनाथ खडसे

माझ्यामागे कितीही चौकश्या लावा, राष्ट्रवादी झिंदाबाद म्हणणारच –  एकनाथ खडसे

जळगाव –  एकनाथ खडसेंच्या मागे सर्व यंत्रणा लावल्या आहेत. मिळेल ती चौकशी करत आहे, प्रचंड छळवणूक केली जात…
Read More