गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग केला, भाजपने देशासाठी काय केले ? नाना पटोले यांचा थेट सवाल 

गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग केला, भाजपने देशासाठी काय केले ? नाना पटोले यांचा थेट सवाल 

मुंबई – अमरावती दंगलीत भाजपाचे आमदार व नेतेच सक्रीय होते, भाजपाच्या नेत्यांनीच चिथावणी देणारी विधाने केली. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर अमरावती दंगलीचे खापर फोडणे चुकीचे आहे असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

टिळक भवन येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पटोले बोलत होते. अमरावती दंगलीप्रकरणी फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे व असा प्रयत्न भाजपाकडून सातत्याने होत आहे. राहुल गांधी यांच्याविषयी बोलण्याचा फडणवीस यांना नैतिक अधिकार नाही. गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग केला आहे, बलिदान दिले आहे, भाजपाने देशासाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित करून देश विकणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असेही पटोले म्हणाले.

दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड डिसेंबर महिन्यात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनातच होईल व अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच होईल, असे देखील पटोले यांनी  स्पष्ट केले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत झालेल्या अधिवेशनाचा कालावधी कमी होता. अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेसाठी तीन दिवसांची कालावधी लागतो त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवड आतापर्यंत झाली नाही. हिवाळी अधिवेशनात मात्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होईल व ती आवाजी मतदानाने होईल असे त्यांनी सांगितले.

आवाजी मतदानाने निवड होण्याची पद्धत देशभर सर्वच राज्यात आहे त्यात काही गैर नाही. विधानसभेने त्यांच्या नियमावलीत बदल केलेला आहे. महाराष्ट्रातही विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवड याच पद्धतीने होत असते त्यामुळे यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही असं देखील ते म्हणाले.

Previous Post
विधानसभा अध्यक्षपदाची निवड हिवाळी अधिवेशनातच : नाना पटोले

विधानसभा अध्यक्षपदाची निवड हिवाळी अधिवेशनातच : नाना पटोले

Next Post
'टॉप - ५ केसेस ट्रान्स्फर करण्याची मागणी होते... हे का करण्यात येतेय याचं उत्तर केंद्रसरकारने द्यावे'

‘टॉप – ५ केसेस ट्रान्स्फर करण्याची मागणी होते… हे का करण्यात येतेय याचं उत्तर केंद्रसरकारने द्यावे’

Related Posts
वाहनचालकांकडून वसूल केला जाणारा जाचक दंड तातडीने रद्द करा, आमदार धंगेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वाहनचालकांकडून वसूल केला जाणारा जाचक दंड तातडीने रद्द करा, आमदार धंगेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Ravindra Dhangekar :- पुणे शहरात वाहनचालकांवर सीसीटिव्हीच्या माध्यमातून ठोठावण्यात येत असलेला जाचक दंड आणि खटले तातडीने मागे घ्या,…
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी महायुतीची जय्यत तयारी पूर्णत्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी महायुतीची जय्यत तयारी पूर्णत्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांची मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी पुण्यातील टिळक रस्त्यावरील सभा महाविद्यालय या…
Read More
Yogesh Tillekar

‘भारतात सतत होणाऱ्या पराभवांमुळे खचून न जाता नेपाळच्या राजकारणात संधी शोधताना राजकुमार साहेब …’

पुणे – परदेश दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी ( Congress leader Rahul Gandhi ) यांचा नाईट क्लबमधील…
Read More