गंगाखेड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्षप्रतिपदा उत्सवानिमित्त पथसंचलन

गंगाखेड/विनायक आंधळे :- वर्षप्रतिपदा उत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे (Rashtriya Swayamsevak Sangh) सघोष व सदंड पथसंचलन उत्साहात काढण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गंगाखेड (Gangakhed) तालुक्याच्या वतीने रविवार, 26 मार्च 2023 रोजी सायंकाळी 05:00 वाजताच्या सुमारास राणीसावरगाव (Ranisawargaon) येथे सघोष पथसंचलन पार पडले.

यावेळी, संचलन मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून स्वयंसेवकांवर पुष्पांची वृष्टी करत या पथसंचलनाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. काळी टोपी, दंड संघाच्या संपूर्ण गणवेशात गंगाखेड तालुक्यातील गणवेशधारी स्वयंसेवकांनी या पथसंचलनात सहभाग घेतला. महादेव मंदिर (Mahadev Mandir) राणीसावरगाव येथे सांगता झाली. यावेळी, उत्सवाचे प्रमुख वक्ते ऋषिकेश कासांडे यांचे बौद्धिक झाले. यावेळी, तालुका संघचालक, कार्यवाह, संघ कार्यकर्ते व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.