गँगस्टर गोल्डी ब्रारने स्वीकारली सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी, एफबी पोस्टमध्ये लिहिले कारण

नवी दिल्ली-  29 मे रोजी लोकप्रिय पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येने पंजाबमध्ये खळबळ उडाली होती. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. दुसरीकडे, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हत्येबद्दल शोक व्यक्त केला आणि लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

पंजाबचे डीजीपी व्ही.के. भवरा सांगतात की, जेव्हा सिद्धू मुसेवाला घरातून बाहेर पडले तेव्हा वाटेत समोरून 2-2 वाहने आली आणि त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी घटनेच्या तीन तासांनंतर गँगस्टर गोल्डी ब्रारने फेसबुक पोस्टद्वारे हत्येची जबाबदारी स्वीकारली.

गोल्डी ब्रारने फेसबुकवर एका पोस्टद्वारे लिहिले आहे की,  सर्व भावांना राम राम, सत् श्री अकाल, मूसवालाच्या हत्येची आज जबाबदारी, मी गोल्डी ब्रार, सचिन विश्नोई, लॉरेन्स बिश्नोई ग्रुप याची जबाबदारी घेतो. आमचा भाऊ विकी मिड्डूखेडा याच्या हत्येला  बदला आम्ही आज घेतला आहे.

आमच्या साथीदाराच्या हत्येप्रकरणी मुसेवालाचे नाव समोर आल्यानंतरही पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. मुसेवालाच्या जास्त  ओळखी असल्यामुळे त्याला शिक्षा झाली नाही. त्यामुळेच आज ही हत्या करण्यात आली आहे.

गोल्डी ब्रार सध्या कॅनडामध्ये आहे. त्याचवेळी त्याचा साथीदार आणि टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई हा राजस्थानमधील अजमेर तुरुंगात बंद आहे. मूसेवाला यांच्यावर आठ हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा पोलिसांचा दावा आहे. घटनास्थळावरून तीन एके-९४ रायफलच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.