सलमानला आमची माफी मागावी लागेल…; गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची ‘भाईजान’ला चेतावणी

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने तुरुंगातून एका टीव्ही वाहिनीला मुलाखत दिली. यात त्याने मोठे खुलासे केले असून त्याने अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला पुन्हा धमकी दिली आहे. सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लॉरेन्सने सलमानचा अभिमान मोडित काढूनच शांत बसेल, असे म्हटले आहे.

सलमानने आपल्या समाजाला निराश केले आहे. आपल्या समाजातील लोकांमध्ये झाडे, वनस्पती आणि प्राणी यांच्याबद्दल खूप श्रद्धा आहे. सलमानने आमच्या समाजाचा अपमान केला आहे. त्याने सर्वांसमोर येऊन माफी मागावी अशी आमची इच्छा आहे, असे यावेळी गँगस्टर बिश्नोईने सांगितले आहे.

राजस्थानमधील बिकानेरमध्ये आमच्या समाजाचे एक मंदिर आहे. सलमानने तिथे जाऊन माफी मागावी. त्याने असे केले तर आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. त्याने तसे केले नाही तर आम्ही कायद्याचा आधार घेणार नाही. स्वतःच्या पद्धतीने हिशोब करणार, अशी खुली चेतावणी बिश्नोईने दिली आहे.