Gary Kirsten | ‘गॅरी पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नको, भारताला प्रशिक्षण देण्यासाठी ये’; माजी खेळाडूचा सल्ला

पाकिस्तान क्रिकेट संघावर तीव्र टीका करताना मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) म्हणाले की, संघात एकता नाही आणि त्यांनी आपल्या प्रदीर्घ प्रशिक्षक कारकिर्दीत अशी परिस्थिती पाहिली नाही. 2022 च्या टी-20 विश्वचषकात उपविजेते ठरलेल्या पाकिस्तान संघाची अलीकडच्या काळातली सर्वात वाईट कामगिरी होती.

‘पाकिस्तान संघात एकता नाही’
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्स्टनने (Gary Kirsten) सध्या टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर संघावर टीका करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. एका वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकाराने कर्स्टनचा हवाला देत म्हटले की, ‘पाकिस्तान संघात एकता नाही. ते त्याला संघ म्हणतात, पण तो संघ नाही. खेळाडू एकमेकांना साथ देत नाहीत. प्रत्येकजण वेगळा आहे. मी अनेक संघांसोबत काम केले आहे, पण अशी परिस्थिती कधीच पाहिली नाही.’

यावर माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने 2011 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक कर्स्टन यांना मोठा सल्ला दिला आहे. कर्स्टन यांच्या या वक्तव्यावर हरभजन सिंग ट्विट करत म्हणाला की, ‘गॅरी तिथे वेळ वाया घालवू नको, भारताला प्रशिक्षण देण्यासाठी ये… गॅरी कर्स्टन एक हिरा आहे. 2011 च्या आपल्या संघातील ते एक सर्वोत्तम प्रशिक्षक, मार्गदर्शक, मित्र आहेत. आपला 2011चा विश्वचषक विजेता प्रशिक्षक… खास व्यक्ती गॅरी…,’ असं हरभजन सिंग ट्विटमध्ये म्हणाला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like