Gautami Patil Video : सबसे कातिल… गौतमी पाटीलचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

Gautami Patil video : ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ (Gautami Patil), ‘गौतमीकी झलक सबसे अलग’….. सध्या लावणी म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा नाव समोर येतं ते म्हणजे गौतमी पाटीलचं. अश्लील डान्समुळे चर्चेत आलेल्या गौतमीच्या नृत्यानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलयं. गौतमीची क्रेझ इतकी आहे की आता मोठमोठ्या कलाकारांचे कार्यक्रम सोडून प्रेक्षक गौतमीचे कार्यक्रम पाहण्यास गर्दी करतात.

डान्सर गौतमी पाटील (Dancer Gautami Patil) ही कायमच चर्चेत असते. मात्र यावेळी एका वेगळ्या कारणासाठी गौतमी पाटील चर्चेत आली आहे. पुण्यात गौतमी पाटीलच्या बदनामीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील (Pune) एका स्टेजशो दरम्यान कपडे बदलताना गौतमीचेअश्लील चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

साम टीव्ही ने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल केला जात आहे (Gautami Patil video) . गौतमी पाटीलची लोकप्रियता वाढत असताना तिला बदनाम करण्यासाठी हा घृणास्पद प्रकार केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस (police) स्टेशनला गौतमी कडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा व्हिडीओ एकमेकांना फोरवर्ड करू नका असं आवाहन देखील सोशल मिडीयावर केले जात आहे.