Rahul Dravid | ‘जंटलमन’ राहुल द्रविड, माझ्या सहकाऱ्यांएवढेच पैसे मलाही द्या म्हणत नाकारला 5 कोटींचा बोनस

भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी क्रिकेट चाहत्यांची मने त्यांच्या एका ठळक निर्णयाने जिंकली आहेत. टी -20 विश्वचषक जिंकल्यानंतर द्रविडने 5 कोटी रुपयांचा बोनस 2.5 कोटी रुपये कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने नुकतीच भारतीय संघाला 125 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली होती. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत करून टी20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले.

बीसीसीआयने जाहीर केले होते की एकूण 125 कोटी रुपये संघाला देण्यात येतील. यात कोचिंग स्टाफ आणि सहाय्यक कर्मचारी समाविष्ट आहेत. या पैशांची खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमध्ये विभागणी केली जाणार आहे. सर्व खेळाडूंना 5 कोटी भेटतील तर प्रशिक्षकांना अडीच कोटी मिळतील. मात्र मुख्य प्रशिक्षक असल्याने राहुल द्रविड यांना 5 कोटी देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. तर इतर प्रशिक्षकांना 2.5 कोटी रुपये मिळणार होते.

द्रविडचा ‘सज्जन’ विचार
हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार, द्रविड  (Rahul Dravid) यांनी बीसीसीआयला आपले बक्षीस अडीच कोटी पर्यंत कमी करण्याचे आवाहन केले, कारण त्यांना फलंदाजी, गोलंदाजी आणि फील्डिंग प्रशिक्षकांपेक्षा जास्त पैसे मिळवायचे नव्हते. राहुल द्रविडचा असा विश्वास आहे की सर्व प्रशिक्षकांना समान रक्कम मिळावी.

बीसीसीआयच्या स्त्रोताचा हवाला देत या अहवालात म्हटले आहे की, “राहुल द्रविडला त्याच्या उर्वरित कर्मचार्‍यांप्रमाणे समान बोनस घ्यायचे आहेत.” आम्ही त्यांच्या भावनांचे कौतुक करतो. ‘ असे म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like