राजतिलक की करो तयारी, अब है केजरीवाल की बारी !

पंजाब : राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले आहे.

उत्तरप्रदेशसह सर्व देशाचे लक्ष लागलेली निवडणूक म्हणजे पंजाबची. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील असे बोलले जात असताना आजच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसने निवडणुकीपूर्वी फेरबदल करत चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं होतं. काँग्रेसमधील अंतर्गत कलह त्यातही कॅप्टन अमरिंदर सिंग विरुद्ध नवज्योत सिंग सिद्धू हा वाद मिटवण्यासाठी काँग्रेसने हा उपाय केला होता. पण त्यानंतरही कलह काही थांबला नाही. नंतर सिद्धू आणि चन्नी असा वाद सुरू झाला. त्यातच अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्ष स्थापन करून निवडणूक लढवली.

आता सुरवातीच्या कलांमध्ये आम आदमी पक्षाने ६७ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसला १८, अकाली दल १२ आणि भाजपने २ जागांवर आघाडी घेतली आहे. 117 जागांसाठी झालेल्या या मतदानात एक्झिट पोलनुसार आप आघाडीवर दिसत होतं. आपची सत्ता येईल असं चित्रं होतं. सुरवातीच्या कलात तरी आता भगवंत मान पंजाबचे सरदार ठरणार असच दिसतंय. म्हणजे राजतिलक की करो तयारी, अब है केजरीवाल की बारी ! असं म्हंटल तर वावग ठरणार नाही