घर घर तिरंगा अभियान सर्वसामान्यांचा अभिमान – अजित चव्हाण

Mumbai – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना, देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी (Narendra Modi) यांनी घरघर तिरंगा अभियान हे आवाहन करून जणू सर्वसामान्य भारतीयांचा सन्मान केला आहे. अशोक चक्रांकित तीन रंगांचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान, आपली राष्ट्रीय प्रतीके ही जीवापाड जपली पाहिजे,याची शिकवण प्रत्येक भारतीयाला घरातूनच मिळते. त्या भावनेला अधिक घट्ट करणारा हे घरघर तिरंगा अभियान आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष होत आहेत, आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, यावेळी आपल्या घरावर तिरंगा फडकावून हा आनंद साजरा करणं हे प्रत्येक भारतीयांसाठी सर्वोच्च अभिमानाच्या क्षणांपैकी एक असेल. मात्र यापूर्वी ध्वजसंहितेमध्ये अडकलेल्या प्राणप्रिय तिरंगा झेंडा खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्यासाठी खुला करण्याचं काम माननीय पंतप्रधानांनी (Prime Minister) केलं. यासाठी माननीय पंतप्रधानांचे शतशः आभार.

देशाचा सर्वोच्च नेता जेव्हा जनतेला एखाद्या गोष्टीसाठी साद घालतो त्यावेळी राष्ट्रभावना चेतावणे, आपण एक आहोत ही भावना सर्वसामान्यांमध्ये पुन्हा-पुन्हा रुजवणे याकरता आपल्या राष्ट्रीय प्रतीकांचा (National Symbol) वापर झाला तर त्याचं स्वागतच व्हायला हवं, मात्र आपल्या लोकशाहीत सरसकट कुठल्याही गोष्टीला विरोध करण्याची प्रवृत्ती बोकाळलेल्या विरोधी पक्षांना (Opposition Party) आपण कशाचा विरोध करत आहोत याचेही भान राहत नाही? घर-घर तिरंगा अभियानाला विरोध करताना अनेकांनी पातळी सोडली मला त्यांच्यावर आता टीका करायची नाही, शेवटी जो तो आपल्या कुवतीनुसार विचार करत असतो. मात्र या देशात काँग्रेसची (NCP) सत्ता असताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) हे विरोधी पक्ष नेते असताना अटलजींनी राष्ट्रहिताच्या भूमिकेत सरकारला वेळोवेळी दिलेलं समर्थन आज टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, याची आठवण करून द्यावीशी वाटते.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना घराघरावर तिरंगा लागला पाहिजे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका निश्चितच पुढच्या पिढ्यांमध्ये राष्ट्रभावना चेतवणारी आहे. १३ ते १५ ऑगस्ट घरघर तिरंगा अभियान देशभरामध्ये होणार आहे.हे अभियान नुसताच एक सरकारी अभियान नाही, तर घराघरातून त्याची चाललेली तयारी पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला किती जबरदस्त प्रतिसाद लाभला याची प्रचिती येते. आज घराघरात विशेषतः लहान आणि तरुण मुलांमध्ये याची मोठी उत्सुकता आहे. आपल्या घरी आपण तिरंगा फडकवणार याचा या पुढच्या पिढीला खरोखर मनापासून आनंद होतो आहे. सर्वसामान्यांची नस माहिती असणारा नेता अशी नरेंद्र मोदींची ओळख आहे या अभियानाच्या निमित्ताने पुन्हा याची प्रचिती आली आहे. हे अभियान जाहीर झाल्यानंतर त्यावर टीका करणाऱ्यांच्या पोटात यामुळेच गोळा आला नसावा ना?

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जाहीर केलेल्या अनेक योजनांची अशीच खिल्ली उडवण्यात आली होती मात्र खिल्ली उडवणाऱ्यांना जनतेने थेट घरी पाठवलं. माननीय पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ या रेडिओद्वारे देशाशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमाला देखील काहींनी असाच विरोध केला होता.मात्र विरोध करणाऱ्यांचे दात त्यांच्याच घशात गेले. देशभरामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेला मन की बात हा कार्यक्रम अनेक वेगवेगळ्या विषयां संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्यांचे केलेलं कौतुक याकरता देशभरामध्ये लोकप्रिय ठरलेला आहे. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना काश्मीर मधला 370 कलम हटवणाऱ्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी माननीय गृहमंत्री अमित शहाजी (Amit Shah)यांची जनता नक्की आठवण करेल.हा फडकणारा तिरंगा पाहून भारतीय जनता पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही ‘एक देश मे दो प्रधान, दो विधान, और दो निशान, नही चलेंगे, नही चलेंगे’ असं म्हणून काश्मीर साठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी (Dr. shyam mukherjee) यांच्या बलिदानाची हा तिरंगा फडकवताना नक्की आठवण येईल.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वसामान्यांना ध्वजसंहितेमुळे आपल्या घरी किंवा खाजगी जागेत तिरंगा फडकवताना काहीशी धाकधूक असायची हे त्रिवार सत्य आहे.आपला प्राणप्रिय तिरंगा काही काळाकरता का असेना ध्वजसंहितेतून मोकळा करून सर्वसामान्यांना तो फडकावता येईल, घर घर तिरंगा लावता येईल ही संकल्पनाच किती छान आहे. आपल्या देशाच्या हिंदू संस्कृतीमध्ये ध्वजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आमच्या शूर पूर्वजांनी परकीय आक्रमकांशी लढताना भगव्या ध्वजासाठी प्राण दिले. स्वातंत्र्यानंतर आपला राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्यासाठी बलिदान देणाऱ्या, स्वातंत्र्य चळवळीतील शहिदांची देशातल्या जनतेला आठवण येईल. स्वातंत्र्यानंतर झालेल्या प्रत्येक युद्धात शांततेच्या काळात देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांची आम्हाला नक्की आठवण येईल. ‘झंडा ऊँचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा’ हे गीत गाताना घर घर तिरंगा अभियान साजरा करत असताना, ज्या ज्या शहिदांनी तिरंगा लपेटून घेऊन शहीद होण्याचे स्वप्न साकार केलं. देशासाठी, तिरंग्याच्या सन्मानासाठी, देश बांधवांच्या रक्षणासाठी, आपल्या परिवाराचा… आप्तेष्टांचा कुठलाही विचार न करता सर्वोच्च बलिदान दिलं.त्यांची ही आठवण आम्हाला घरघर तिरंगा फडकावताना येईल.

अनेकांनी या अभियानावरती टीका करताना आमच्याच देश बांधवांचा एक प्रकारे अपमान केलाय ज्याला घर नाही? तो कुठे तिरंगा फडकवणार? अशा पद्धतीची ही खालच्या पातळीवरची टीका होती. अशी टीका करणाऱ्यांना एकच सांगावसं वाटतं शेतकरी आणि सैनिक हा गरिबाच्या झोपडीतूनच येतो. क्रांती ही गरिबाच्या झोपडीतूनच झालेली आहे. याच गोरगरिबांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला म्हणून ते पंतप्रधान झालेले आहे. माननीय नरेंद्र मोदी जी किंवा भाजपाचे कार्यकर्ते या टिकेन विचलित होणारे नाहीत. याच गरिबांच्या झोपड्यांपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी नरेंद्र मोदीजी काम करतायेत.घर घर तिरंगा अभियानाला देशभरात मोठा प्रतिसाद लाभेल यात शंकाच नाही. भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे देशाचा हिंदू संस्कृतीचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अभिमान असणारे कार्यकर्ते आहेत.अर्थातच ‘राष्ट्रहित सर्वप्रथम’ या शिकवणीत घडलेले आहे. वेळोवेळी राष्ट्रविरोधी शक्तींशी हात मिळवणी केलेल्यांना अभय देणाऱ्या पक्ष्यांची त्यांच्या नेत्यांची ही टीका हास्यास्पद आहे. याचे उत्तर जनतेने वेळोवेळी दिलेलंच आहे. ज्या अभियानाची आपण खिल्ली उडवली त्याच अभियानाची देशात आज सर्वाधिक चर्चा आहे हेच या मंडळींना जनतेने दिलेलं उत्तर आहे.

देशाच्या जनतेने विशेषतः तरुण आणि लहान मुला-मुलींनी माननीय पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत घराघरातून घर घर तिरंगा अभियानाची चालवलेली तयारी पाहता गोष्ट तशी छोटीशी पण किती डोंगराएवढी आहे हे जाणवतं.माननीय पंतप्रधानांची कल्पनाच मोठ्या प्रमाणावर सामूहिक राष्ट्रभक्ती जागृत करणारी आहे. आमचा ध्वज, आमचा तिरंगा, आमचा अभिमान… आम्हाला आमच्या घरावर फडकवता येणार हेच किती छान वाटतंय. देशाच्या घराघरावर तिरंगा फडकवला जाईल. ज्यावेळी शहिदांची आठवण केली जाईल. त्यावेळी शहीद भगतसिंगांच्या ‘देश मांगता आहे कुर्बानीया’ उक्तीची ही आम्हाला निश्चितच आठवण होईल. देशाप्रती कर्तव्याच्या भावनेने पुढच्या पिढ्या तिरंग्या पुढं नतमस्तक होताना हा देश बळकट करण्याचे स्वप्न नक्कीच पाहतील. माननीय पंतप्रधानांच्या आवाहनानुसार देशातच नाही तर जगभरात भारतीय घरघर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहात साजरा करतील. हा देश आमचा अभिमान आहे. हा तिरंगा आमचा प्राण आहे. आम्ही सारे भारतीय त्याच्या सन्मानाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देऊ देशाला विकासाच्या वाटेवर पुढे नेऊ! जय हिंद! वंदे मातरम! – अजित चव्हाण (Ajit Chavan) (प्रदेश प्रवक्ता,भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)