Uday Samant | घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा आरोपी भावेश भिंडे उबाठाचा कार्यकर्ता, उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

Uday Samant | मुंबईतील घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेतील (Ghatkopar hoarding incident) आरोपी भावेश भिंडे हा उबाठामध्ये काम करण्यास तयार झाला होता मात्र त्याच्याकडे मुंबईतील होर्डिंगची जबाबदारी देण्यात आली. त्याला मुंबई महापालिकेतून होर्डिंग देण्यात आली आणि त्याबदल्यात उबाठाच्या नेत्यांचे वाढदिवस आणि निवडणूक प्रचारासाठी या बेकायदा होर्डिंगचा वापर झाला, असा गौप्यस्फोट मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला. भिंडे आणि उद्धव ठाकरें चे फोटो यावेळी मंत्री सामंत यांनी दाखवले.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबतची महत्वाची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, भावेश भिंडे याच्यामागे मोठी राजकीय शक्ती आहे. भिंडे हा प्यादा असून ही होर्डिंगचा खरा मालक आणि सूत्रधार शोधण्याची आवश्यकता आहे. भिंडेवर अनधिकृत होर्डिंग लावण्याचे, झाडे मारल्याचे २१ गुन्हे दाखल आहेत.

घाटकोपर येथील होर्डिंगबाबत स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेला २४० तक्रारी केल्या होत्या, मात्र त्यावर कारवाई का झाली नाही, असा सवाल मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला. शिवसेना विभाग प्रमुख परमेश्वर कदम यांनी देखील तक्रार केली होती. मात्र मागील तीन साडेतीन वर्षात भिंडेने होर्डिंग काढणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मुंबई महापालिकेत उबाठाची २५ वर्ष सत्ता होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मग या भिंडेला कोणी मोठे केले. त्याला कोणाचा आशिर्वाद आहे, असा प्रश्न मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला. भिंडेला राजाश्रय होता. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप