सर तन से जुदा : ‘गृह विभाग आता देवेन्द्रजी सांभाळत आहेत हे समाजकंटकांनी लक्षात ठेवावे’

अमरावती –  अमरावतीच्या परतवाडा गावात रविवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत या वादग्रस्त घोषणाबाजी करण्यात आली आणि आता या घटनेचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये आरोपी ‘सर तन से जुदा’चा नारा देताना ऐकू येतो. या व्हिडिओच्या आधारे अमरावती पोलिसांनी आयपीसीच्या कलम ५०५, १५३ आणि मुंबई पोलिस कायद्याच्या इतर कलमांखाली सार्वजनिक गैरवर्तनाचा गुन्हा दाखल केला. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींचे वय 25 आणि 35 वर्षे आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमरावतीच्या ग्रामीण भागात रविवारी ईद मिलाद-उन-नबी निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत घोषणाबाजी करण्यात आली. याठिकाणी घोषणाबाजीचा व्हिडिओही समोर आला आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपच्या निलंबित सदस्या नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्या विधानाच्या समर्थकांवर सातत्याने हल्ले होत होते. हे हल्लेखोर प्रत्येक वेळी ‘सर तन से जुदा…’ ही घोषणा देत असत. दरम्यान,  अमरावती मधील धर्मांधांकडून दिल्या गेलेल्या सर तन से जुदा घोषणा प्रकरणाच्या चौकशीचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

दरम्यान, या घडामोडींवर आता भाजप नेते गिरीश खत्री यांनी भाष्य केले आहे.अशा प्रकारच्या घोषणा देवून दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटक आणि त्यांच्या पाठीराख्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. गृह विभाग आता देवेन्द्रजी सांभाळत आहेत हे  समाजकंटकांनी लक्षात ठेवावे एवढंच मी आता सांगतो. या कृत्याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश देणाऱ्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी देखील या निमित्ताने करतो. असं त्यांनी म्हटले आहे.